शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

सीईटी परीक्षेसाठी मुलाला घेऊन चाललेला पिता अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 11:59 IST

केगाव येथील घटना; टेम्पो चालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्दे टेम्पोने धडक दिल्यानंतर वडील रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यामध्ये पडले होपरीक्षेचा नंबर बघण्यासाठी पुढे गेलेल्या मुलाने वडिलांकडे धाव घेतलीरक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना स्वत:च्या हाताने उचलले

सोलापूर : सीईटी परीक्षेसाठी मुलाला घेऊन आलेल्या पित्याचा केगाव येथील सिंहगड कॉलेजसमोर टेम्पोने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरणबसप्पा म्हेत्रे (रा. गौडगाव (बु), ता. अक्कलकोट) असे ठार झालेल्या पित्याचे नाव आहे. शरणबसप्पा म्हेत्रे यांचा मुलगा केदार शरणबसप्पा म्हेत्रे (वय १९) याची सीईटीची परीक्षा होती. सीईटीच्या परीक्षेसाठी त्याचा नंबर सोलापुरातील केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आला होता. शरणबसप्पा म्हेत्रे हे सोमवारी पहाटे उठून मुलगा केदार म्हेत्रे त्याला घेऊन मोटरसायकल (क्र. एमएच 13/बीए ०३५३) वरून सोलापुरात आले.

सिंहगड कॉलेजसमोर गर्दी असल्यामुळे त्यांनी त्यांची मोटरसायकल सर्व्हिस रोडवरील उजव्या बाजूला लावली. मुलाला घेऊन ते त्याचा नंबर कुठे आला आहे हे पाहण्यासाठी जात असताना पुण्याच्या दिशेहून सोलापूरकडे येणा?्या टेम्पो (क्र. एमएच ०५/ डीके ८४९३) ने जोरात धडक दिली. धडकेत शरणबसप्पा म्हेत्रे हे गंभीर जखमी झाले. त्यांना मुलांनी तत्काळ रिक्षात घालून सोलापूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास फौजदार सचिन मंद्रूपकर करीत आहेत.जखमी पित्याला उचलून मुलाने घातले रिक्षात- टेम्पोने धडक दिल्यानंतर वडील रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यामध्ये पडले होते. परीक्षेचा नंबर बघण्यासाठी पुढे गेलेल्या मुलाने वडिलांकडे धाव घेतली, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना स्वत:च्या हाताने उचलले. रस्त्यावरून जाणा?्या रिक्षाला थांबून आतमध्ये घातले. वडिलांना वाचविण्यासाठी त्याने रिक्षाचालकाला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही आणि शेवटी त्याच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातexamपरीक्षाEducationशिक्षण