शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

शेतकरीप्रश्नी स्वाभिमानी' आक्रमक; मंगळवेढा - सोलापूर  महामार्गावर चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 14:56 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा : शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत व  जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अगोदर ऊसदर (एफआरपी) जाहीर करावा व मगच हंगाम सुरू ठेवावा, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व पीक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावेत तसेच मागील गळीत हंगामामधील थकीत ऊसबिल न देणाऱ्या साखर कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, शेतकऱ्यांना त्यांची थकीत ऊसबिले त्वरीत मिळावीत या मागण्यांसाठी  स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गुरुवारी मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर माचणूर येथे चक्का जामआंदोलन करण्यात आले.

  सन २०२०-२१ गळीत हंगाम सुरू होऊन सुद्धा अद्यापर्यंत उसाचा दर जाहीर केला नाही तरी वाढती महागाई  लक्षात घेता एफआरपी अधिक १४ टक्के वाढ ऊसदर जाहीर करावा तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई त्वरित मिळावे, पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तात्काळ आदेश द्यावेत त्याचबरोबर शेतकरी विरोधी कायदे माघारी घ्यावेत या सर्व मागण्यांचा विचार करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाकडे व कारखादारांकडे वारंवार पाठपुरावा केला. पाठपुरावा करुन देखील या मागण्यांना यश आलेले नाही. आता संघटना रस्त्यावर उतरली असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुल घुले, श्रीमंत केदार यांनी सांगितले.

यावेळी ॲड. राहुल घुले अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, दत्तात्रय  गणपाटील , शंकर संघशेट्टी, सतीश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हर्षद डोरले, श्रीकांत पाटील, रोहित भोसले, विजय पाटील, संतोष बिराजदार, आबा खांडेकर, बाळासाहेब घोडके, पांडुरंग बाबर, बाळासाहेब कपले, अप्पू पाटील, राजेंद्र राणे, रेवणसिद्ध नांगरे, रणजितसिंह गवळी, शुभम सावंत यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरीagricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने