शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

दिवसा सिंचनाची सोय अन् वीज बिलातून झाली शेतकºयांची मुक्तता

By appasaheb.patil | Updated: March 13, 2020 12:02 IST

महावितरण; सोलापूर जिल्ह्यात ३४० सौर कृषिपंप कार्यान्वित

ठळक मुद्देकृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्ही किंवा १०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्रवीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यांसारख्या अडचणी येतातदुर्गम व डोंगराळ भागात वीज यंत्रणेचे जाळे नसलेल्या भागात डिझेल इंधनाचा वापर

सोलापूर : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमधून सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ३४० सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सौर कृषिपंपांमुळे शेतकºयांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला असून त्यांची वीज बिलातून देखील मुक्तता झाली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या निकषानुसार पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत २१८० शेतकºयांना कोटेशन देण्यात आले आहे. त्यातील १३३८ शेतकºयांनी कोटेशनच्या रकमेचा भरणा केला आहे. शेतकºयांनी निवडलेल्या एजन्सीजना महावितरणकडून वर्कआॅर्डर देण्यात येत आहे. त्याप्रमाणे तीन एचपी क्षमतेचे २७८ आणि पाच एचपी क्षमतेचे ६२ असे एकूण ३४० सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. 

कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्ही किंवा १०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात व त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र वीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यांसारख्या अडचणी येतात. दुर्गम व डोंगराळ भागात वीज यंत्रणेचे जाळे नसलेल्या भागात डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालविले जातात. या सर्वांसाठी पर्याय म्हणून दिवसा तसेच शाश्वत व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा,यासाठी सौर कृषिपंप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.

अशी आहे योजना- यापूर्वी कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही किंवा शुल्क भरूनही वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून सौर कृषिपंप देण्यात येत आहे. यामध्ये सोलर पॅनेल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे व इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. तीन किंवा पाच एचपी क्षमतेच्या सौरपंपाद्वारे विहीर, नदी, शेततळे, कालव्यामधून पाण्याचा उपसा करून पाईपद्वारे पिकांना पाणी देता येते. - सौर कृषिपंपाला कोणत्याही इंधन वा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, कमी-अधिक दाब, सिंगल फेज समस्या, पंप जळणे या समस्याही उद्भवत नाही.- महत्त्वाचे म्हणजे सुमारे २५ वर्षे सेवा देऊ शकणाºया सौर कृषिपंपाचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे. तसेच शेतकºयांची वीज बिलापासून सुद्धा मुक्तता होणार आहे. तीन व पाच एचपी क्षमतेच्या सौर कृषिपंप योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० टक्के आणि अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गासाठी ५ टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरी