तळ्यामध्ये मोटर सोडत असताना शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू
By काशिनाथ वाघमारे | Updated: April 18, 2023 21:16 IST2023-04-18T21:15:30+5:302023-04-18T21:16:12+5:30
याबाबत वैराग पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे.

तळ्यामध्ये मोटर सोडत असताना शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : तळ्यामध्ये पाणबुडी मोटर सोडत असताना विजेचा धक्का बसून शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. बाबासाहेब सुभाष सुरवसे (४० रा. हत्तीज, ता. बार्शी) असे विजेच्या धक्याने मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ही घटना बार्शी तालुक्यात हिंगणी मध्यम प्रकल्प येथे मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत वैराग पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, शेतकरी बाबासाहेब सुभाष सुरवसे हे सध्या पिंपरी येथे राहतात. दरम्यान मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास हिंगणी मध्यम प्रकल्पामध्ये पाणबुडी मोटार सोडण्याकरिता गेले होते. यावेळी त्यांना चालू मोटारीतून विजेचा करंट बसला आणि ते जागीच मरण पावले. याबाबतची सागर सुभाष सुरवसे यांनी वैराग पोलिसात खबर दिली आहे.