शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

गावी परतण्यासाठी ती फॅमिली आली तब्बल सोळाशे किलोमीटर दुचाकीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:43 IST

बिस्कीट खात अन् पायी चालतही निघाली अनेक कुटुंबं गावाकडे परतू लागली

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बागकामांसाठी अनेक परप्रांतीय मजूर येऊन स्थायिकबेरोजगार बनलेली ही मंडळी वाहनांअभावी चालत आपल्या राज्याकडे निघाली ‘कितने भी दिन लगेंगे... लेकीन हम अपने घर वापस जायेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ही मंडळी चालत पुढे गेली

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : बेंगलोर से राजस्थान के भिलवाडा जा रहे है. वहॉँ पे तो कोई रहने नही दे रहा इसलिए राजस्थान जा रहे है, आपको मारना हे तो मारो साहब मगर हम वापस नही जाएंगे. हमे अपने घर जाने दो, अशा शब्दात आईस्क्रिम विक्रेत्या कुटुंबांतील व्यक्ती जागोजागी चौकशी करणाºयांना उत्तरे देत होती.

बंगळुरु येथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय करणारे सहा जण दोन बाईकवरुन जात होते. सोमवारी बंगळुरुमधून निघाल्यानंतर बुधवारी ते सोलापुरात पोहोचले. येथून तुळजापूर- उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद मार्गे मध्यप्रदेश नंतर राजस्थान येथे जात आहेत. देशभर लॉकडाऊन केल्यानंतर घर मालकाने त्या कुटुंबीयांना घर सोडण्यास सांगितले. तसेच तीन महिन्याचे भाडे मागितले. आता समोर काही पर्याय दिसत नसल्याने त्यांनी बाईकवरच आपला प्रवास सुरु केला. सोलापुरात येईपर्यंत ६०० किलोमीटरचा प्रवास झाला होता.

पुढे आणखी सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. कर्नाटक सीमेवर त्यांची गाडी बिघडली. दुरुस्त करणाºयाने ३ हजार ५०० रुपये घेतले. पण गाडी व्यवस्थित दुरुस्त केली नसल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळपासून फक्त बिस्कीट खाऊनच ते प्रवास करत आहेत. याची माहिती मिळताच प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी त्यांना जेवण दिले.

लॉकडाऊन करण्यापूर्वी थोडा वेळ द्यायचा होता- जगभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. या आजारामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. या काळजीपोटी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. आजार पसरु नये अशी त्यांची भूमिका होती. पण, ज्यांना घर आहे त्यांचे ठिक आम्हाला घरच नाही. लॉकडाऊन पूर्वी थोडा वेळ दिला असता तर आम्ही आमच्या घरी पोहोचलो असतो. सध्या सगळीकडूनच संकटे येत आहेत.

सहाशे किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत केला आहे. आणखी एक हजार किलोमीटर जायचे आहे. रस्त्यात कितीही अडथळे आले तरी घरी पोहोचायचे आहे. मरण आले तर आमच्या गावातच यावं.- कैलास कुमावत

तळपायाला आले फोड... सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बागकामांसाठी अनेक परप्रांतीय मजूर येऊन स्थायिक झाले आहेत. मात्र कर्फ्यूमुळे सर्व व्यवहारच ठप्प झाल्याने बेरोजगार बनलेली ही मंडळी वाहनांअभावी चालत आपल्या राज्याकडे निघाली आहेत. पंढरपूरहून मध्यप्रदेशातील आपल्या गावी निघालेली ही मंडळी मोडनिंब येथे आली असता त्यांची सोय करण्याचा शब्द स्थानिक नागरिकांनी दिला होता; मात्र ‘कितने भी दिन लगेंगे... लेकीन हम अपने घर वापस जायेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ही मंडळी चालत पुढे गेली. विशेष म्हणजे अनेकांच्या तळपायाला फोडही आले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMadhya Pradeshमध्य प्रदेशtwo wheelerटू व्हीलर