शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंब सोडताहेत घरं; नातेवाईकांच्या घरी आता शोधताहेत आसरा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:44 IST

संचारबंदी शिथिलतेच्या काळात पलायन; तीनशेहून अधिक लोकांना नवीन विडी घरकुलातून लावले परतावून

ठळक मुद्देकोरोना रुग्ण आढळल्यानंतर पाच्छा पेठ, दत्तनगर, कुचन नगर, जमखंडी पूल परिसरासह सोलापुरातील जवळपास १७ किलोमीटर एरिया सील सकाळच्या सत्रात सीलबंद एरिया परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही कमी असतो. फायदा घेत काही लोक बाहेर पडतात

सोलापूर : दोन दिवसांपासून भाजीपाला खरेदी करता सकाळी काही वेळेची सूट देण्यात आली आहे. याचा फायदा घेत सीलबंद एरियातील काही नागरिक दुसºया एरियातील आपल्या नातेवाईकांकडे आसरा शोधण्याचा प्रयत्न करताहेत. मंगळवारी व बुधवारी सकाळी साडेपाच वाजल्यापासून काही नागरिक हातात पिशव्या घेऊन आपल्या नातेवाईकांकडे जाताना दिसले. पोलिसांची नजर चुकवत गुपचूपपणे सीलबंद एरियातून बाहेर पडण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांपासून सुरू असल्याची माहिती आहे. 

नवीन विडी घरकूल परिसरात अशा लोकांचा शिरकाव होत होता. अशा तीनशेहून अधिक नागरिकांना नवीन घरकूल परिसरातून परतवून लावल्याची माहिती ‘सिटू’ च्या कार्यकर्त्यांनी दिली.

कोरोना रुग्ण आढळल्यानंतर पाच्छा पेठ, दत्तनगर, कुचन नगर, जमखंडी पूल परिसरासह सोलापुरातील जवळपास १७ किलोमीटर एरिया सील झालेला आहे. शहरातील मोठा परिसर अनिश्चित काळासाठी सील झाल्याने लोकांची धाकधूक वाढली. सीलबंद परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. जीवनावश्यक वस्तू मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सीलबंद परिसरातील लोक तणावग्रस्त आहेत. यातून सुटका मिळविण्यासाठी सकाळी लवकर उठून काही लोक आपल्या नातेवाईकांच्या घरी आसरा शोधण्याचा प्रयत्न करताहेत.

सकाळी सहा वाजता....- सकाळी सहा ते आठ दरम्यान गुरुनानक चौक, बोरामणी नाका परिसर तसेच शांती चौक ते नवीन विडी घरकूलकडे जाणाºया मार्गावर तुम्हाला अनेक लोक हातात पिशव्या घेऊन बाहेर फिरताना दिसतील. यातील बहुतांश लोकांना विचारल्यास भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडल्याचे सांगतात. कदाचित ते खरे असेल. काहींच्या पिशवीत कपडे आणि औषधे सापडतील. अधिक विचारपूस केल्यास कोणीतरी सांगतील की मुलीकडे चालले, काकांकडे चाललोय, मामांकडे चाललोय म्हणून. परंतु त्यातील बहुतांश लोक हे दुसºया एरियात आसरा शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येईल. सकाळच्या सत्रात सीलबंद एरिया परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही कमी असतो. फायदा घेत काही लोक बाहेर पडतात. जुना विडी घरकूल, नवीन विडी घरकूल, नीलम नगर, अशोक चौक परिसरात आसरा शोधणाºयांचे प्रमाण अधिक आहे.

सीलबंद एरियातून बाहेर पडून काही लोक नवीन विडी घरकूल परिसरात येत होते. अशा सर्व लोकांचा आम्ही शोध घेतला आहे. काहींना पोलिसांच्या हवाली केले आहे तर काहींना आम्ही घरकूल परिसरातून परतवून लावले आहे. तीनशेहून अधिक लोकांना आम्ही नवीन विडी घरकूल परिसरातून परतवून लावले आहे. सुरुवातीच्या काळात याचे प्रमाण सर्वाधिक होते, यावर आता आम्ही नियंत्रण मिळवलं आहे.- वसीम मुल्ला,सिटू कार्यकर्ता, कुंभारी विडी घरकूल परिसर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस