शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

Maharashtra Election 2019; फडणवीस, ठाकरे, शरद पवार, येडीयुरप्पा भरणार सोलापूरच्या प्रचारात रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:08 IST

आठ दिवस उरले शिल्लक; असदुद्दिन ओवेसी पुन्हा येणार सुजात आंबेडकर यांच्या बैठका अन् सभांना

ठळक मुद्दे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिलेजाहीर सभा, कॉर्नर सभा आणि पदयात्रांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा होणार

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या आठवड्यात जाहीर सभा, कॉर्नर सभा आणि पदयात्रांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. 

यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी खूप कमी कालावधी मिळाल्याची खंत विविध पक्षातील उमेदवार व्यक्त करीत आहेत. पहिल्या आठवड्यात नवरात्रोत्सव होता. लोक सणासुदीत गुंतले होते. त्यामुळे उमेदवारांची दमछाक झाली. आता आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने बूथ यंत्रणा लावण्यासोबतच प्रचाराचा जोर वाढविण्यासाठी धडपड सुरू आहे. पंढरपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होईल, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले होते. ही सभा रद्द झाली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर मध्य आणि शहर उत्तरसाठी एका मध्यवर्ती ठिकाणी जाहीर सभा घ्यावी, यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा १६ आॅक्टोबर रोजी सोलापुरात येत आहेत. लिंगशेट्टी मंगल कार्यालयात ते समाज बांधव आणि व्यापाºयांशी संवाद साधणार आहेत. अल्पसंख्याक नेत्या डॉ. नाहिद शेख दौºयावर येत आहेत. या भेटीत त्या शहर उत्तर, शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघात बैठका घेणार आहेत. 

एमआयएमसाठी खासदार असदुद्दिन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी मागील आठवड्यात जाहीर सभा घेतली होती. आता पुन्हा बुधवारी असदुद्दिन ओवेसी यांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी मोहोळ मतदारसंघात सभा आहे. शहर उत्तर आणि माढ्यात पवारांसह अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांची जाहीर सभा व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

माकपसाठी सीताराम येचुरी येणार- माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या प्रचारासाठी अर्थतज्ज्ञ प्रा. अजित अभ्यंकर, बार्शीचे कामगार नेते प्रा. तानाजी ठोंबरे यांच्यासह कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्या कन्या माजी खासदार सुभाषिनी अली, माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर, बंगालचे माजी खासदार महंमद सलीम यांच्या जाहीर सभा होणार आहेत. माकपचे केंद्रीय महासचिव सीताराम येचुरी यांच्या  उपस्थितीत १९ आॅक्टोबरला प्रचाराचा समारोप होणार आहे. 

खामोश... शत्रुघ्न सिन्हा येणार- माजी खासदार, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या सोलापूर दक्षिण मतदारसंघात जाहीर सभा होणार आहेत. शहर मध्य मतदारसंघात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची जाहीर सभा होणार आहे. 

सुजात यांचीही सभा- वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर मंगळवारी सोलापुरात येत आहेत. न्यू बुधवार पेठेतील आंबेडकर उद्यानात जाहीर सभा होणार आहे. शहर उत्तर, मध्य आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातील नियोजनाचा आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपाShiv Senaशिवसेना