शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त ठरलेल्या गुरुजींचे होणार झेडपीच्या शाळांमध्ये समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:41 IST

सोलापूर: जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समावेशनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता या ...

ठळक मुद्देशिक्षकांच्या समायोजनेसंबंधी यापूर्वीच सर्वांच्या हरकती घेऊन त्यावर सुनावणी घेण्यात आली आता अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समुदेशन करुन त्यांना नियमानुसार समायोजन करुन घेण्यात येईल

सोलापूर: जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समावेशनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता या शिक्षकांची झेडपीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होणार असून, येथे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना ठरलेल्या शाळांवर नियुक्ती होणार आहे.

याप्रसंगी झेडपीचे मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र भारुड, माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश जोशी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, डायटच्या प्राचार्या ज्योती मेटे यांची उपस्थिती राहणार आहे. यांच्या उपस्थितीत शिक्षकांना समुपदेशनानंतर समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये सन २०१६-१७ व १७-१८ मध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार शिक्षण विभाग अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे. २०१६-१७ च्या सेवक संचानुसार १३४ शिक्षक अतिरिक्त कक्षेत आले होते. त्यातील १०३ शिक्षकांचा प्रश्न यापूर्वीच मार्गी लागले आहेत. उर्वरित ३७ शिक्षकांचा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. झेडपीकडे  मराठी माध्यमासाठी २५, कन्नडसाठी २५ आणि उर्दू विभागासाठी ७ अशा ३७ जागा रिक्त आहेत. या शिक्षकांना शिक्षण विभाग समाविष्ट करून घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

सन २०१७-१८ साठी ६० पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठी माध्यमासाठी ३९, कन्नड १५ आणि उर्दू माध्यमासाठी ६ अशा ६० जागांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची वर्णी लावण्यात येणार आहे. याशिवाय याच वर्षातील बिगर अल्पसंख्याक विभागात मराठी माध्यमासाठी २२ पदे तर अल्पसंख्याक विभागामध्ये १७ पदे रिक्त ठरली आहेत. या सर्वांचे सेवाज्येष्ठतेनुसार समायोजन करून घेण्यात येणार  आहे. उर्वरित रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेकडे समाजयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

याप्रसंगी झेडपीचे मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र भारुड, माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश जोशी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, डायटच्या प्राचार्या ज्योती मेटे यांची उपस्थिती राहणार आहे. यांच्या उपस्थितीत शिक्षकांना समुपदेशनानंतर समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.

शिक्षकांच्या समायोजनेसंबंधी यापूर्वीच सर्वांच्या हरकती घेऊन त्यावर सुनावणी घेण्यात आली आहे. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आलेले आहे. आता अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समुदेशन करुन त्यांना नियमानुसार समायोजन करुन घेण्यात येईल.- संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदTeacherशिक्षकSchoolशाळाEducationशिक्षण