शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांना भरघोस निधी

By admin | Updated: June 10, 2014 00:56 IST

सतरा कोटींची तरतूद : ४०० अंगणवाड्यांना मिळेल मंजुरी

सोलापूर : मागील वर्षीची अखर्चित व यावर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून १६ कोटी ७५ लाख रुपये आमच्याकडे असून, यातून सुमारे ४०० अंगणवाड्यांच्या इमारतींच्या बांधकामाला मंजुरी दिली जात असल्याचे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयमाला गायकवाड यांनी सांगितले.सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १२४४ अंगणवाड्यांसाठी इमारती नाहीत. उघड्यावर, मंदिरात, जि.प. शाळेत व खासगी जागेत या अंगणवाड्या भरविल्या जात आहेत. मागील वर्षी एका अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी साडेचार लाख रुपये दिले जात होते. परंतु एवढ्या रकमेतून इमारत बांधकाम होत नव्हते. रक्कम अपुरी पडत असल्याने अनेक अंगणवाड्यांची कामे सुरुच होऊ शकली नाहीत. त्यामुळे मागील वर्षीची दोन कोटी २५ लाख इतकी रक्कम अखर्चित राहिली होती. यावर्षी जिल्हा नियोजन मंडळाने १४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम अंगणवाड्या इमारतींची बांधकामे करण्यासाठी खर्च करावयाची आहे. यातून सुमारे ४०० अंगणवाडी इमारतींच्या बांधकामांना मंजुरी दिली जात असल्याचे सभापती जयमाला गायकवाड यांनी सांगितले.जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नाहीत. बहुतांश अंगणवाड्या भाड्याच्या जागेत भरतात. आता या अंगणवाड्यांना जिल्हा नियोजन मंडळाकडून भरघोस निधी मिळाल्याने या अंगणवाड्यांच्या इमारती उभ्या करण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या पंचायत समितीकडून अंगणवाडीच्या जागांसाठी कागदपत्र मागणी केली जात आहेत. कागदपत्र आलेल्यांना लागलीच मंजुरी दिली जाणार असल्याचे सभापती जयमाला गायकवाड यांनी सांगितले.----------------------------पुन्हा आचारसंहिता...४सध्या जिल्हा परिषद विकासकामांबाबत कडक अंमलबजावणी करीत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर अंगणवाड्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळेल परंतु या कामाचे ई-टेंडर निघणार आहे. ही प्रक्रिया काहीकेल्या विधानसभा निवडणुकीअगोदर होईलच असे सांगता येणार नाही. त्यामुळे अंगणवाड्यांची कामे कधी सुरू होणार व पूर्ण कधी होणार हा प्रश्न आहे.----------------------शासनाने अंगणवाडी इमारतीसाठी आता सहा लाख रुपये इतकी रक्कम केली आहे. मागील वर्षीपेक्षा दीड लाखाने रक्कम वाढविल्याने अंगणवाड्यांची कामे होतील. जागेचा उतारा व कागदपत्रे सादर करावीत.- जयमाला गायकवाडसभापती, बालकल्याण जि.प.