शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पतीचे अनैतिक संबंध उघडकीस आणले; म्हणून सुरू केला पत्नीचा छळ, सासूसह चौघांवर गुन्हा दाखल

By रवींद्र देशमुख | Updated: October 21, 2023 14:46 IST

पती कार्तिक रेड्डी, सासू सुनंदा रेड्डी, नणंद सुधा कुमार व मानलेली नणंद दीपा थंबकर (सर्व रा. भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, नई जिंदगी सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या चौघांची नावे आहेत.

सोलापूर : पतीचे परस्त्रीशी असलेले अनैतिक संबंध उघड केल्याने, चिडलेल्या पतीकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार योगिता कार्तिक रेड्डी (वय 30 हाउसिंग सोसायटी, नई जिंदगी सोलापूर) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

पती कार्तिक रेड्डी, सासू सुनंदा रेड्डी, नणंद सुधा कुमार व मानलेली नणंद दीपा थंबकर (सर्व रा. भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, नई जिंदगी सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या चौघांची नावे आहेत.

फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी योगिता यांचा विवाह कार्तिक याच्याशी एप्रिल २०१७  साली झाला. लग्नानंतरच्या काही दिवसांनी फिर्यादी योगिता यांना आपल्या पतीचे परस्त्रीशी अनैतिक संबंध असल्याचे कळाले. या  प्रकाराची वाच्यता झाल्याने पतीसह सासरकडील मंडळी फिर्यादीवर चिडून होते,  त्यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला उपाशी ठेवणे, एकटीलाच काम करावयास लावणे, लग्नात मानपान व हुंडा न मिळाल्याने तसेच माहेरच्या लोकांना शिवीगाळ करणे असे प्रकार सातत्याने सुरू होते. शिवाय श्रीमंत घराण्यातील मुलीशी लग्न केले असते तर मोठ्या प्रमाणात हुंडा व सोने मिळाले असते असे म्हणून 'तू आम्हाला व्यवसायासाठी पाच लाख रुपये घेऊन ये' म्हणून छळ केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या सांगण्यावरून मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचे वैवाहिक जीवन उध्वस्त केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसMolestationविनयभंग