शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

प्रयोगशील शेतकरी; काकडीनं केली बळीराजाच्या आयुष्यात क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:27 PM

गौडगावच्या केदार बमदे यांचा प्रयोग : साडेतीन महिन्यांत मिळवले एकरी लाखाचे उत्पन्न

ठळक मुद्देजिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती असली की कुठल्याही क्षेत्रात यश मिळू शकते ‘स्वाती महाराणी’ या सुधारित काकडीचे वाण लावून साडेतीन महिन्यांत एकरी लाखाचे उत्पन्न केवळ ४० दिवस व्यवस्थित रोगराईवर लक्ष देऊन निगराणी केले

शिवानंद फुलारी 

अक्कलकोट: जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती असली की कुठल्याही क्षेत्रात यश मिळू शकते. याचे मूर्तिमंत उदा. म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बु़ येथील प्रगतिशील शेतकरी केदार शिवकुमार बमदे यांनी ठिबक सिंचनाद्वारे गुजराती सिड्सचे ‘स्वाती महाराणी’ या सुधारित काकडीचे वाण लावून साडेतीन महिन्यांत एकरी लाखाचे उत्पन्न काढले. 

 

पूर्वीच्या काळी बमदे यांच्या कुटुंबात पारंपरिक शेती केली जात असे, त्यास फाटा देत केदार यांनी सुधारित शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी आजवर विविध प्रकारची फळपिके घेतलेली आहेत. त्यापैकी काकडीचे वाण हे एक आहे. गेल्या आॅक्टोबर महिन्यात सुधारित ‘स्वाती महाराणी’ नावाच्या काकडीच्या वाणाची दोन एकरामध्ये लागवड केली. त्यासाठी सुधारित पद्धतीने ठिबक सिंचनाद्वारे नियोजन करून टोकन पद्धतीने लावले. केवळ ४० दिवस व्यवस्थित रोगराईवर लक्ष देऊन निगराणी केले. काकडी काढणीला सुरुवात झाली. चांगल्या प्रकारे दर मिळाला. या दोन एकराच्या माध्यमातून खर्च वजा जाता तब्बल दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. यासाठी               कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन लाभले आहे. एकूणच माणसाकडे जिद्द,चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती असली की, कुठल्याही क्षेत्रात  माणूस यश मिळवू शकतो. हे मूर्तिमंत उदाहरण अक्कलकोट तालुक्यात पाहायला मिळत आहे.यासाठी कृषी सहायक  चिदानंद खोबण तसेच शेतकरी महांतेश बमणगी, हणमंतराय बिराजदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे बमणी यांनी सांगितले. 

अशी केली लागण आॅक्टोबर-१९ मध्ये जमीन मशागत करण्यात आली. सहा फूट अंतरावर सºया सोडण्यात आल्या. त्यावर मल्चिंग पेपर टाकून ड्रीप अंथरण्यात आले. जिगजाग पद्धतीने सव्वा फूट अंतरावर एक या अंतराने एक बिया टोकण करण्यात आले. दरम्यान नागणे, करपा, दवणी यासारख्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारे औषध फवारणी करण्यात आली़ केवळ ४० दिवसांत काकडीचे तोड सुरुवात झाली. बघता बघता एक महिना सिझन चालू राहिला. त्यामध्ये दोन एकराच्या जमिनीत खर्च वजा जाता दोन लाख रुपये केवळ साडेतीन महिन्यांत मिळाले आहे. 

एकरी ६०० कॅरेट माल - एकरी साधारण ६०० कॅरेट काकडी निघाली. प्रत्येक कॅरेटला तब्बल ६५० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. यासाठी कर्नाटक राज्यातील कलबुर्गी व अक्कलकोट अशा दोन बाजारपेठेत या मालाची विक्री करण्यात आली. कृषी विभागाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून संबंधित शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. 

पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने करायचो. गेल्या काही वर्षांपासून सुधारित पद्धतीने शेती करून, एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न केवळ तीन महिन्यांत मिळत आहे. कलिंगड,काकडी यासारख्या नवजातीचे बियाणे लावून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतो. माझे बघून अनेकांनी अशा पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न चालविला आहे- केदार बमदे, शेतकरी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळे