शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीतून नरेंद्र मोदी सभेसाठी झाला ९४ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 12:39 IST

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी झालेल्या दौºयाचा ९४ लाख रुपयांचा खर्च आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेच्या ...

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी झालेल्या दौºयाचा ९४ लाख रुपयांचा खर्च सर्व कामांच्या वर्क आॅर्डर महापालिकेकडून देण्यात आल्या आहेतसार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील कामे बांधकाम विभागानेच केली

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी झालेल्या दौºयाचा ९४ लाख रुपयांचा खर्च आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेच्या माथी आला आहे. विशेष म्हणजे मोदींच्या या दौºयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रे नगर आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांचे उद्घाटन केले होते. 

पंतप्रधान मोदी यांच्या दौºयाच्या निमित्ताने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने विमानतळ ते पार्क स्टेडियम या मार्गावर विविध कामे केली. या दौºयामुळे शहराच्या मुख्य रस्त्याचे चित्र पालटून गेले.  मोदींची सभा पार्क स्टेडियमवर झाली. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेला करावे लागले. मोदींचे हेलिकॉप्टर होम मैदानावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. होम मैदान परिसरात विविध कामे करण्यात आली.

या सर्व कामांच्या वर्क आॅर्डर महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील कामे बांधकाम विभागानेच केली आहेत. महापालिकेने केलेल्या कामांचा खर्च ९४ लाख २१ हजार रुपये झाला आहे. विविध विभागांनी नगर अभियंता विभागाकडे हा खर्च सादर केला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत आहे. नगरसेवकांना भांडवली कामांसाठी निधी मिळालेला नाही. भांडवली कामांसाठी निधी द्या म्हणून नगरसेवक आयुक्तांकडे फेºया मारत असतात. मोदींच्या दौºयाचा खर्च महापालिकेच्या माथी पडल्यामुळे  या विषयावर राजकारण होण्याची शक्यता आहे. 

असा झाला खर्च - चार हुतात्मा पुतळा ते जलतरण तलाव व अ‍ॅप्रोच रस्ते तयार करणे, नॉर्थकोट हायस्कूल पाठीमागील रस्ता करणे, डफरीन चौक ते महापौर निवास, रामलाल चौक, सरस्वती चौक यादरम्यान रस्ता करणे (१९ लाख ४४ हजार), होटगी रोड महिला हॉस्पिटल ते पटवर्धन चौक पॅचवर्क करणे (५ लाख ९० हजार), पार्क स्टेडियमला पांढरा फ्रायमर कोट करणे (५ लाख ७० हजार), शहरात होर्डिग्ज, प्रवेश पत्र, निमंत्रण पत्रिका, जाहिराती व बॅक ड्रॉप (४ लाख ८० हजार), शहरात कमान व होर्डिंग बसविणे (८३ हजार), शहरातील विविध ठिकाणी भिंतीवर पांढरा रंग मारणे (२ लाख ४७ हजार).

क्लब हाऊस व चार पुतळा येथील रंगरंगोटी करणे ( १ लाख ८५ हजार), पंतप्रधान व इतर अधिकाºयांच्या चहापानासाठी खर्च (७७ हजार रुपये), इंदिरा गांधी स्टेडियम येथे मुख्य कार्यक्रमस्थळी स्टेज, मंडप, खुर्च्या, बॅरिकेडिंग, साऊंड सिस्टीम, सजावट, पिण्याचे पाणी (४५ लाख ६८ हजार), पार्क स्टेडियम आणि शहरात फलक बसविणे (३६ हजार), विमानतळ ते चार पुतळ्यापर्यंत लाकडी व लोखंडी बॅरिकेडिंग, पडदा टाकणे (४ लाख ३० हजार), होम मैदानाभोवती पत्रा पार्टीशन मारणे (१ लाख ३० हजार), पार्क स्टेडियममध्ये वायरिंग करणे (२५ हजार), होम मैदान आणि नॉर्थकोट प्रशाला येथे पाण्याच्या टॅँकरने पाणी मारणे (१७ हजार), डिजिटल व्हिडिओ (९ हजार), निवेदिका मानधन (३० हजार).

विशेष अनुदानाची प्रतीक्षापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयानिमित्त केलेल्या कामांच्या वर्कआॅर्डर महापालिकेने दिल्या होत्या. या कामाची बिले विविध विभागांनी तयार केली आहेत. पण ही बिले अद्याप स्वीकारण्यात आलेली नाहीत. राज्य शासनाकडून विशेष अनुदान येईल, अशी महापालिकेला अपेक्षा आहे. - अजय पवार, मुख्य लेखाधिकारी, महापालिका. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा