सहलीला निघालेल्या बसचा अपघात; शिक्षक जागीच ठार, एक गंभीर

By विलास जळकोटकर | Updated: December 21, 2023 11:22 IST2023-12-21T11:22:43+5:302023-12-21T11:22:57+5:30

या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला.

Excursion bus accident Teacher killed on the spot, one critical | सहलीला निघालेल्या बसचा अपघात; शिक्षक जागीच ठार, एक गंभीर

सहलीला निघालेल्या बसचा अपघात; शिक्षक जागीच ठार, एक गंभीर

सोलापूर / विलास जळकोटकर

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे थांबलेल्या  टेम्पोला सहलीच्या एस टी बसने धडक दिल्याने अपघात होऊन एक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक जखमी झाला. या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला.

मिळालेल्या माहितीनुसार एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस सहल घेऊन गेली होती. या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाठ यांना डोक्याला किरकोळ जखम झाली आहेत शिक्षक बाळकृष्ण काळे जागेवरच मयत झाले जखमी व मयताला 108 अकलूज 0742 या ॲम्बुलन्सने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Excursion bus accident Teacher killed on the spot, one critical