शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

३ ढाब्यांवर 'एक्साईज'च्या धाडी; १९ मद्यपींसह ३ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल

By appasaheb.patil | Updated: November 24, 2022 18:43 IST

सोलापूरमधील ३ ढाब्यांवर 'एक्साईज'च्या धाडी टाकण्यात आल्या असून १९ मद्यपींसह ३ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील ३ धाब्यांवर अचानक धाडी टाकून धाबा चालकांसह त्या ठिकाणी दारु पितांना आढळून आलेल्या १९ मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, २३ नोव्हेंबर मिळालेल्या बातमीच्या आधारे निरीक्षक अ विभाग यांनी त्यांच्या स्टाफसह शहरातील ३  धाब्यांवर धाडी टाकून कारवाई केली. निरिक्षक संभाजी फडतरे यांचे पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव-देगाव रोडवरील हॉटेल जयभवानी फॅमिली गार्डन धाब्यावर छापा टाकून धाबा चालक बाबाराव हरीबा जाधव (वय ४९ रा. केगाव-देगाव रोड) यांच्यासह ९ मद्यपी ग्राहक असे एकूण १० जणांना व दुय्यम निरिक्षक पुष्पराज देशमुख यांचे पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील दक्खनचा वाडा या धाब्यावर धाड टाकून धाबा चालक गणेश सुभाष मोरे व ६ मद्यपी ग्राहक असे एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

तसेच दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांनी त्यांच्या पथकासह हैदराबाद रोडवरील विडी घरकुल परिसरातील हॅाटेल लक्ष्मी या धाब्यावर अवैधरीत्या ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणाऱ्या चालक राजेश सिद्राम बिंगी व त्याठिकाणी दारु पित बसलेल्या ४ ग्राहक असे एकूण ५ जणांना अटक केली. अटक आरोपींच्या ताब्यातून विविध ब्रॅंडच्या विदेशी मद्याच्या व बीअरच्या बाटल्या, प्लास्टीक व काचेचे ग्लास इ.  असे एकूण चार हजार तीनशे सत्तर किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी २४ नोव्हेंबर रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असता दारूबंदी न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी नम्रता बिरादार यांनी तात्काळ निकाल देत तिन्ही ढाबाचालकांना प्रत्येकी २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार असा एकूण १ लाख १३ हजारांचा दंड ठोठावला आहे. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण, अनिल चासकर विभागीय उप-आयुक्त, पुणे  यांचे आदेशान्वये अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फ़डतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक  उषाकिरण मिसाळ, पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपूरे, प्रियंका कुटे, व वाहनचालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली.

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी