शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंनी ऐकली शांताबाईंची व्यथा, घर बांधून देणार; प्रहारने घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 18:01 IST

निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १५०० रुपये  मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच शांताबाईं दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत

सोलापूर - मुलाला डॉक्टर केल्यानंतर सुखाचे दिवस बघण्याची आशा असतानाच शांताबाई काळे यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. मोठा आधार कोसळला. चाळीस वर्षे लावणी कला जोपासणाऱ्या आणि या लावणीच्या बळावर मुलाला मोठे केलेल्या डॉ. किशोर काळे यांच्या आई शांताबाई काळे या आज अत्यंत दयनीय अवस्थेत आयुष्य जगत आहेत. राहत्या घरासाठी त्यांचा संघर्ष सुरू असून दोनवेळच्या जेवणाचाही प्रश्न आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त दिल्यानंतर प्रहार संघटनेनं याची दखल घेतली असून आता माजी मंत्री आ. बच्चू कडू हे शांताबाईंच्या मदतीसाठी आले आहेत. यासंदर्भात त्यांनी फोनवरुन शांतबाईशी संवादही साधला. 

निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १५०० रुपये  मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच शांताबाईं दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. तेही कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही. तीन-तीन महिने विलंब होतो. राहायला घर नाही. भाड्याने तर कधी इतरत्र राहावे लागते. भाडं द्यावं की पोट भरावं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीतून त्यांना रोजचे जीवन जगावं लागत आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच बच्चू कडूंनी शांताबाईंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

आता इथून पुढे जोपर्यंत शांताबाईंच पक्क घर तयार होत नाही, तोपर्यंत घराचं भाडं आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी प्रहार जनशक्ती पक्षाने दाखवली आहे. तसेच, लवकरात लवकर दोन पक्क्या खोल्या बांधून दाखवण्याची ही जबाबदारी प्रहार जनशक्ती पक्ष घेणार आहे, असे प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे शांताबाईंच्या घराची प्रतीक्षा सध्या तरी संपल्याच दिसून येते. दरम्यान, शांताबाईंचं फोनवरुन बच्चू कडूंशी बोलणंही कुलकर्णी यांनी करुन दिलं. 

भारुडांची बदली झाली अन् प्रश्न रेंगाळला

'कोल्हट्याच पोर' या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांना 'कोणी घर देत का घर' असं म्हणण्याची वेळ आली होती. सोलापूरच्याकरमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शांताबाईंच्या घरासाठी जागा मिळवून दिली होती. मात्र, भारुडांची बदली झाली आणि हा विषय मागे पडला. त्यामुळे एकेकाळी महाराष्ट्रभर नावाजलेल्या लोककलावंत शांताबाई काळे यांना भाड्याच्या घरात कसेबसे दिवस काढण्याची वेळ आली आहे.   

टॅग्स :SolapurसोलापूरBachhu Kaduबच्चू कडूHomeसुंदर गृहनियोजनkarmala-acकरमाळा