शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महापौर येण्यापूर्वीच पालकमंत्र्यांनी केले चौकातील हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:42 IST

सोलापूर शहरात चर्चा : शोभा बनशेट्टी यांनी व्यक्त केला त्रागा

ठळक मुद्देसमाचार चौकात साडेपाच लाख खर्चून हायमास्ट उभारण्यात आला नगरसेवक अमर पुदाले यांनी हायमास्टचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होतापालकमंत्री देशमुख यांनी महापौर बनशेट्टी यांची वाट न पाहता कार्यक्रम उरकला

सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी कार्यक्रमाला येण्याआधीच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण केल्यामुळे शहर उत्तर विधानसभा मतदार संघात चर्चेचा विषय झाला आहे.

समाचार चौकात साडेपाच लाख खर्चून हायमास्ट उभारण्यात आला आहे. नगरसेवक अमर पुदाले यांनी गुरूवारी सायंकाळी सात वाजता या हायमास्टचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. यासाठी महापौर शोभा बनशेट्टी व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते. 

ठरल्याप्रमाणे पालकमंत्री विजयकुमार देशमुख कार्यक्रमास आले. त्यामुळे संयोजकांनी महापौरांशी संपर्क साधला. निरोप मिळाल्यावर महापौरही कार्यक्रम स्थळाकडे निघाल्या. पण पालकमंत्री देशमुख यांनी महापौर बनशेट्टी यांची वाट न पाहता कार्यक्रम उरकला. याप्रसंगी नगरसेवक नागेश भोगडे, अनिल बनसोडे, खंडू बनसोडे, अ‍ॅड. कोंडा, तुळशीदास भुतडा, मोहन क्षीरसागर, विश्वनाथ मादगुंडी, बंटी बेळमकर, बंटी सावंत, मनोज गायकवाड, सतीश भोसले आदी उपस्थित होते. 

कार्यक्रम झाल्यानंतर पालकमंत्री देशमुख निघून गेले. त्यानंतर महापौर बनशेट्टी या कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. पण तेथे कोणीच नव्हते. कार्यक्रम संपल्यामुळे सर्व जण निघून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे त्यांनी नगरसेवक पुदाले यांच्याशी संपर्क साधून त्रागा व्यक्त केला. विशेष म्हणजे गुरूवारी केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी सोलापूर दौºयावर होते. त्यांच्यासमवेत पालकमंत्री देशमुख दिसले नाहीत. ते परगावी असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. पण सायंकाळी सात वाजेच्या हायमास्टच्या कार्यक्रमास मात्र ते उपस्थित राहिले. 

शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील हा कार्यक्रम त्यांनी चुकविला नाही. पण कार्यक्रमासाठी महापौरांचीही त्यांनी वाट पाहिली नाही. त्यामुळे या परिसरात हा विषय चर्चेचा झाला आहे. सध्या शहर उत्तर विधानसभा मतदार संघात पालकमंत्री देशमुख यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर इच्छुकांनीही फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये महापौर बनशेट्टी यांचाही समावेश आहे. तसेच माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनीही याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन दिले आहे. 

घुसमट होत आहे: महापौर- महापालिकेत काम करताना घुसमट होत आहे. शहरातील उड्डाण पुलाबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी काल चर्चा केली. त्यांनी हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. आता २४ आॅगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर मुक्कामी आहेत. त्यावेळी त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

कार्यक्रमाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख व महापौर शोभा बनशेट्टी या दोघांना आमंत्रित करण्यात आले होते. पालकमंत्री आले तेव्हा महापौरांना निरोप दिला. पण पाऊस सुरू झाल्याने लोक निघून जाऊ लागल्याने पालकमंत्र्यांनी घाईत उद्घाटन केले ही वस्तुस्थिती आहे.- अमर पुदाले, नगरसेवक

टॅग्स :SolapurसोलापूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका