शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्ष उलटून गेले तरीही अक्कलकोटचा रस्ता अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:27 IST

शिवानंद फुलारी अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया कारंजा चौक ते वीज वितरण कंपनी कार्यालयापर्यंतचा रस्ता दीड ...

ठळक मुद्देधुळीने सगळे वैतागले : प्रवेशासाठीचा पर्यायी मार्गही खडतरचअतिक्रमणधारकांची मर्जी राखण्याचा प्रयत्न

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया कारंजा चौक ते वीज वितरण कंपनी कार्यालयापर्यंतचा रस्ता दीड वर्ष उलटून गेले तरी अद्याप पूर्ण झाला नाही. यासाठी नगरपालिका प्रशासनासह पदाधिकारी ठेकेदारांना जाब विचारत नसल्याचाच हा परिणाम आहे. यामुळे शहरवासीयांची मात्र मुस्कटदाबी होत आहे.

अक्कलकोट शहरात प्रवेश करणारा हा रस्ता नादुरुस्त व अर्धवट स्थितीत असल्याने बायपासवरून राजवाड्याच्या पाठीमागील चढण्याच्या कच्च्या रस्त्यावरून जावे लागत आहे. हा पर्यायी मार्गही खडतरच आहे. इतका त्रास होत असतानाही सगळेच चिडीचूप असल्याने आश्चर्य व्यक्त होत  आहे. वारंवार रस्त्यावर खड्डे पडत असल्याने शासनाने सात कोटी रुपये मंजूर केले; मात्र हा रस्ता सतरा महिने उलटले तरी पूर्णत्वाकडे जाताना दिसत नाही.

पूर्वीच्या खराब रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. कसेबसे दोन वर्षांपूर्वी युती शासनाने सात कोटी रुपये निधी रस्ता बांधणीसाठी दिले. त्यानंतर ई-टेंडरमध्ये सोलापूर येथील पाटील अँड पाटील या कंपनीला ठेका मिळाला. तत्काळ कामाला सुरुवातही केली. सर्व रस्ता जेसीबीने उखडून टाकला. त्यानंतर ज्या पद्धतीने गतीने रस्ता बांधणी काम होणे गरजेचे होते. ते होताना दिसत नाही. यामध्ये नगरपालिका अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वय राहिला  नाही. म्हणून कोणाचा कोणावर   वचक राहिलेला नाही. परिणामी  दीड वर्षानंतरही हा रस्ता अपूर्ण आहे.

या रखडलेल्या रस्त्यामुळे या मार्गावरील व्यापाºयांना धुळीचा त्रास होत आहे. याबरोबर त्यांचा दैनंदिन व्यापाºयांना फटकाही बसला आहे. सर्वात कहर म्हणजे या मार्गावरून ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर, आंबेडकर जयंती, शिवजयंती, मोहरम, रमजान, गणपती अशा विविध धार्मिक यात्रा, उत्सवाप्रसंगी कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला जिकिरीचे होऊन बसले आहे. शासनाच्या धोरणानुसार रस्ता नवीन बांधणी करीत असताना दर्जेदार होणे अपेक्षित आहे; मात्र नियमांना बगल देत, अतिक्रमणधारकांना अभय दिल्याचे समोर येत आहे.

अतिक्रमणधारकांची मर्जी राखण्याचा प्रयत्न- या मार्गावरील व्यापाºयांचे धुळीने आरोग्याबरोबर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक तोटाही झाला आहे. या मार्गावरील २०० हून अधिक व्यापारी रस्त्यामुळे वैतागून गेले आहेत. यामध्ये हॉटेलधारक, मोबाईल, किराणा दुकान, चप्पल दुकान, फ्रुटस्, कृषी असे व्यापारी या रस्त्याच्या आजूबाजूला आहेत. अतिक्रमणधारकांची मर्जी राखण्यासाठी रस्ता मोठा करण्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. नगरपालिका ठेकेदाराला वारंवार मुदतवाढही देत आहे. या मार्गाचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. या मार्गावरून जाताना स्वामी भक्तांच्या नाकीनऊ येत आहे. 

रस्ता बांधणीला सुरुवात झाल्यानंतर हे काम लवकर पूर्ण होईल आणि आमची समस्या सुटेल, अशी अपेक्षा होती; मात्र नेमके उलटे होत आहे. सुरुवातीला धुळीचा त्रास होत होता, तर आता रस्ता दीड वर्षापासून पूर्ण होत नसल्याने व्यवसायाची वाट लागली आहे.- स्वामीनाथ हेगडे, व्यापारी, अक्कलकोट

या अपूर्ण रस्त्यामुळे व्यापाºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. अधिकारी व पदाधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याचा गैरफायदा ठेकेदार घेत आहे. रस्त्यावरील धुळीने व्यापारी त्रस्त आहेत. वाहतुकीलाही त्रासही होत आहे.

                    -आप्पासाहेब पाटील, चालक, कृषी भांडार

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षा