तीन महिन्यांनंतरही बंधाऱ्यावरचे कठडे अन् रस्त्यांना मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:31+5:302020-12-30T04:29:31+5:30
वैराग : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते व बंधाऱ्याचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. ते ...

तीन महिन्यांनंतरही बंधाऱ्यावरचे कठडे अन् रस्त्यांना मुहूर्त मिळेना
वैराग : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते व बंधाऱ्याचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. ते तत्काळ बसवावेत, अशी मागणी सभापती अनिल भोसले यांनी आमदार राजेंद्र राऊत व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
तीन महिन्यांपूर्वी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत वैराग परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी बंधारे व छोटे-छोटे पाझरतलाव वाहून गेलेले आहेत. वैराग-उपळे या मार्गावर लाडोळे येथील बंधारा फुटून रस्ता वाहून गेला आहे. मोठमोठे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत पुढे जावे लागते.
तसेत धामणगाव येथे नागझरी नदीवरील बंधाऱ्यांचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. हा बंधारा कोल्हापूर पद्धतीचा असून तीन मीटर अरुंद आहे. येथे लक्ष थोडेजरी विचलित झाले तर मोठा अनर्थ घडू शकतो. हे संरक्षक कठडे तत्काळ बसवावेत.
त्याचबरोबर जवळगाव मध्यम प्रकल्पामुळे येथे ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची वाहने या भागात ऊस तोडणीसाठी आलेली आहेत. आंबेगाव, कासारी, जवळगाव, मिर्झनपूर, भालगाव, आंबाईची, ज्योतिबाची, चिंचखोपन येथून ट्रक, ट्रँक्टर अशी जड वाहने या मार्गावरून ऊस वाहतूक करतात. हा रस्ता संपूर्णपणे उखडून गेला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता दुरुस्त करावा, अशीही मागणी सभापती अनिल डिसले यांनी केले आहे. याशिवाय वैराग - मोहळ, वैराग - माढा, वैराग - तुळजापूर रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी डिसले यांनी आमदार राऊत व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
---
फोटो : २९ बंधारा
धामणगाव येथे नागझरी नदीवरील बंधाऱ्यांचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत.