शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिना उलटला तरी सोलापूर जिल्हा परिषदेचा मार्च एन्ड संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:51 IST

मार्चअखेर उलटून दीड महिना झाला तरी जिल्हा परिषदेचा २०१७-१८ या आर्थिक वर्षातील खर्चाचा ताळमेळ जुळलेला नाही. ‘हे दरवर्षी असेच असते’ असे उत्तर लेखा विभागाकडून दिले जात आहे

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या निधी खर्चाचा हिशेब मार्चअखेर पूर्ण करणे अपेक्षितआजही मागील निधी खर्ची टाकण्याचा कार्यक्रम सुरूव्यक्तिगत लाभाच्या योजनांचा तर बोजवारा उडाला

राकेश कदमसोलापूर : मार्चअखेर उलटून दीड महिना झाला तरी जिल्हा परिषदेचा २०१७-१८ या आर्थिक वर्षातील खर्चाचा ताळमेळ जुळलेला नाही. ‘हे दरवर्षी असेच असते’ असे उत्तर लेखा विभागाकडून दिले जात आहे. विशेष म्हणजे अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे, सदस्य भारत शिंदे, सचिन देशमुख यांच्यासह इतर सदस्यही वित्त व लेखा विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. या विभागाला जि,् प.  अध्यक्ष संजय शिंदे यांनीच ‘सुरक्षा कवच’ दिल्याने अर्थ समितीची मोठी गोची झाल्याची चर्चा जि. प. च्या वर्तुळात आहे. 

जिल्हा परिषदेच्या निधी खर्चाचा हिशेब मार्चअखेर पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु, दरवर्षी मे, जूनपर्यंत विविध कारणांनी निधी खर्ची घालण्याची परंपरा सुरू आहे. ही परंपरा यंदा खंडित होईल, असे पदाधिकाºयांनी सांगितले होते. आजही मागील निधी खर्ची टाकण्याचा कार्यक्रम सुरू आहे. व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा तर बोजवारा उडाला आहे. त्याचाही मेळ जिल्हा परिषदेला घालता आलेला नाही.

लाभार्थ्यांनी वस्तू खरेदी केल्या आहेत. त्याचा लाभ जूनपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारणाने इतर कामेही खर्ची टाकली जात आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजनेमुळेच खर्चाची माहिती संकलित होण्यास वेळ लागत असल्याचे कारणही पुढे केले जात आहे. गेल्या आठ दिवसांत अर्थ समितीच्या दोन सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. या विभागातून व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी अर्थ समितीचे सदस्य करीत आहेत. त्याकडेही विभागप्रमुख दुर्लक्ष करीत आहेत. मुख्य वित्त व लेखाधिकाºयांनी केवळ अध्यक्षांचे ऐकायचे ठरविल्याने महाआघाडीतही नाराजी वाढत चालली आहे. 

सदस्यांनी फक्त संतप्त व्हायचे...मार्चअखेर झालेल्या खर्चाला मंजुरी देण्यासाठी १० मे रोजी अर्थ समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अनेक विभागप्रमुख अनुपस्थित होते. यावरून सभापती विजयराज डोंगरे, भारत शिंदे, सचिन देशमुख हे सदस्य संतप्त झाले. सभा तहकूब झाली आणि ती पुन्हा सोमवार, १४ मे रोजी निश्चित करण्यात आली. चार दिवसांनंतरही खर्चाचा ताळमेळ झालेला नसल्याचे लक्षात आल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त करीत या बैठकीला येणे टाळले. त्यामुळे सचिवांनी उपस्थित सदस्यांपैकी एकाला अध्यक्ष करून बैठक सुरू केली. परंतु, पुन्हा अनेक विभाग प्रमुखांकडून आणि तालुक्यांमधून खर्चाचा हिशेब आला नसल्याचे लक्षात आल्यानंतर  ही सभाही तहकूब करण्यात आली आहे. 

माहिती देत नाही तर कारवाई का नाही?- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात आणि पंचायत समितीमध्ये वित्त व लेखा विभागाची विशेष लोकं आहेत. त्यांच्याकडून जमा-खर्चाचा हिशेब सातत्याने मिळणे अपेक्षित आहे. या विभागातून माहिती येत नाही, अशी तक्रार वित्त व लेखा विभागाचे अधिकारीच करीत असतात. जे विभागप्रमुख वेळेत खर्च सादर करीत नाहीत. त्यांच्या इतर खर्चाला मंजुरी द्यायची नाही, असे ठराव अर्थ समितीच्या सदस्यांनी मांडले आहेत. बैठकीचा अजेंडा मिळत नसल्याच्या तक्रारी सदस्य करीत आहेत. कारवाई संदर्भातील प्रस्तावही वित्त व लेखा विभागानेच सादर करणे अपेक्षित आहे. परंतु, साधे प्रस्तावही जात नसल्याने ‘आनंदी आनंद’ आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदBudget 2018अर्थसंकल्प २०१८