सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 14:48 IST2020-06-23T14:48:11+5:302020-06-23T14:48:18+5:30
देशभरातील नामवंत मुर्तीकरांना देणार निमंत्रण; निधीसाठी लोकप्रतिनिधींना घालणार साकडे

सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे असल्याची माहिती कुलगुरू डॉ़ मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, हा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर बांधण्यात येणार असून यासाठी विद्यापीठ आणि समाजातील मान्यवर आमदार, खासदार यांच्याकडून ही निधी गोळा केला जाणार आहे. हा पुतळा बनविण्यासाठी देशभरातील नामवंत मूर्तिकारांना निमंत्रण देण्यात येणार आहे. आज कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाईन झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.