सोलापुरातील नवी पेठ, मोबाईल गल्ली, शिंदे चौकातील अतिक्रमण हटविलं
By Appasaheb.patil | Updated: August 17, 2023 15:45 IST2023-08-17T15:44:20+5:302023-08-17T15:45:20+5:30
नवीपेठेतील अतिक्रमण काढण्याविषयीची तक्रार महापालिकेने प्राप्त झाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितले.

सोलापुरातील नवी पेठ, मोबाईल गल्ली, शिंदे चौकातील अतिक्रमण हटविलं
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकानं गुरूवारी दुपारी नवी पेठ, मोबाईल गल्ली, शिंदे चौकातील अतिक्रमण हटविलं. यावेळी रस्त्याला अडथळा करणारी खोकी, टपऱ्या, अनाधिकृत पत्राशेड जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकले.
मागील काही दिवसांपासून अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी शहरातील विविध भागात अतिक्रमण काढण्याची मोहिम राबविली. सराफ कट्टा, टिळक चौक, बाळीवेस, सम्राट चौक, सात रस्ता, विजापूर रोड, विजापूर वेस, अवंती नगर, जोडभावी पेठ, सिव्हील चौक आदी परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आली आहेत. गुरूवारी सकाळी नवीपेठ, मोबाईल गल्ली, शिंदे चौकातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस बंदोबस्त पाहून व्यापारी मागे हटले. नवीपेठेतील अतिक्रमण काढण्याविषयीची तक्रार महापालिकेने प्राप्त झाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितले.