शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सोलापूर मनपाच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण, देगाव कोंडवाड्याची जागा, सिमेंटचे साहित्य बनविण्याचा उभारला कारखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:13 PM

देगाव येथे कोंडवाडा व जिमखान्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण करून खासगी व्यक्तींनी सिमेंटपासून साहित्य तयार करण्याचा कारखाना थाटला आहे. 

ठळक मुद्देसिटी सर्व्हे क्रमांक ३३४ वर ग्रामपंचायत असल्यापासूनच कोंडवाड्याचे आरक्षण मनपाने नवीन रचनेत त्या ठिकाणी जिमखान्यासाठी आरक्षण टाकलेमनपाच्या अतिक्रमण विभाग नावाला मंगळवेढा रोडवर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचा ताबा खासगी व्यर्व्हेीने घेतला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : देगाव येथे कोंडवाडा व जिमखान्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण करून खासगी व्यक्तींनी सिमेंटपासून साहित्य तयार करण्याचा कारखाना थाटला आहे. देगाव येथील सिटी सर्व्हे क्रमांक ३३३, ३३४ आणि ३३५ मधील ५ गुंठे जागेची नोंद महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाकडे आहे. सिटी सर्व्हे क्रमांक ३३३ गटमध्ये सार्वजनिक विहीर होती, पण ती बुजवून त्या ठिकाणी कारखाना उभारण्यात आला आहे. सिटी सर्व्हे क्रमांक ३३४ वर ग्रामपंचायत असल्यापासूनच कोंडवाड्याचे आरक्षण आले आहे. मनपाने नवीन रचनेत त्या ठिकाणी जिमखान्यासाठी आरक्षण टाकले आहे. सिटी सर्व्हे क्रमांक ३३५ मध्ये आड असल्याचे नमूद आहे. महापालिकेकडे या जागेची मालकी आल्यावर ताबा घेण्यात आलेला नाही. मंगळवेढा रोडवर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचा ताबा खासगी व्यर्व्हेीने घेतला आहे. अनेक वर्षांपासून त्या जागेत सिमेंटचे पोल, टाक्या, खिडक्या आदी साहित्य तयार करण्याचा कारखाना थाटला आहे. इतकेच नव्हे तर या जागेत पाण्याचे मोठे हौद, विनापरवाना खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. १९८८ सालापासून याच जागेत सार्वजनिक विहीर, कोंडवाडा, विहीर आणि आड असल्याची नोंद उताºयावर आहे. पण मनपाने उताºयावर नाव लावलेले नाही. -----------------अतिक्रमण विभाग नावाला- मनपाच्या अतिक्रमण विभाग नावाला आहे. अधिकाºयांच्या इंटरेस्टने कारवाई केली जाते. खासगी जागेवरील टपºया हटविण्याच्या सुपाºया घेतल्या जात आहेत. याबाबत आयुक्तांची दिशाभूल केली जाते. गरज नसताना बांधकाम नगर रचना विभागाचे अभिप्राय घेऊन हातमिळवणी करून कामे केली जात आहेत. पण सार्वजनिक हिताची लोकशाही दिनात अधिकाºयांनी आदेश देऊनही अतिक्रमणे हटविली जात नाहीत. जाणूनबुजून वादग्रस्त प्रकरणे हाताळून लोक अंगावर येतात, असे भासविले जात आहे. ----------------माहिती अधिकाराचा वापर- देगाव येथील एका कार्यकर्त्याने माहिती अधिकारात या जागेबाबत भूमी व मालमत्ता विभागातून माहिती मागविल्यावर ही बाब उघड झाली. मनपाची इतकी मोक्याची जागा असताना अनेक उपक्रमांसाठी जागेचा शोध घेतला जातो. पण जागा नाही असे दाखवून प्रकल्प गुंडाळले जात आहेत. ही जागा ताब्यात घेण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका