सेवानिवृत्तांचे कर्मचाºयांचे सोलापुरात अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 15:44 IST2018-11-10T15:41:49+5:302018-11-10T15:44:24+5:30
दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सेवानिवृत्तांचे कर्मचाºयांचे सोलापुरात अर्धनग्न आंदोलन
सोलापूर : पेन्शन व अन्य विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्था, संघर्ष समिती, जिल्हा सोलापूरच्यावतीने खा़ शरद बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. देशात ६० लाखांहुन अधिक पेन्शनधारक आहेत. मागील कित्येक वर्षापासून राज्यातील पेन्शनधारकांना कोणत्याच प्रकारचा लाभ मिळत नाही़ याबाबत मागील वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात देशातील मंत्र्यांनी आवाज उठविला होता मात्र त्यानंतर कोणताच फायदा झालेला नाही़ त्यामुळे पेन्शनधारकांच्या मागण्या आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...