शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

देगाव प्रकल्पातील मलनिस्सारणातून वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 08:19 IST

राज्यातील वेगळा प्रयोग : सांडपाण्यावर प्रक्रिया करत साधला आर्थिक फायदा

ठळक मुद्देदीड वर्षात वीज बिलात १३ लाख रुपयांची बचतमहापालिकेच्या देगाव येथील मलनिस्सारण केंद्रात मिथेन वायूपासून वीजनिर्मिती केली जात आहेसध्या उन्हाळ्याच्या दिवसात या प्रकल्पात दररोज सरासरी २५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते

राकेश कदम

सोलापूर : महापालिकेच्या देगाव येथील मलनिस्सारण केंद्रात मिथेन वायूपासून वीजनिर्मिती केली जात आहे. यामुळे गेल्या दीड वर्षात संपूर्ण प्रकल्पाच्या वीज बिलात १३ ते १४ लाख रुपयांची बचत झाली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर वर्षाला २० लाख रुपयांचे वीज बिल कमी येईल, असा दावाही मनपा प्रशासनाने केला आहे. 

देगाव येथील मलनिस्सारण प्रकल्प आॅगस्ट २०१७ मध्ये कार्यान्वित झाला. तीन वर्षांसाठी तो खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला आहे. महापालिकेचे देगावसह प्रतापनगर, कुमठे या ठिकाणी मलनिस्सारण प्रकल्प आहेत. देगाव हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. इतर दोन प्रकल्पांतील शुध्द झालेले पाणी या प्रकल्पात आणण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाला दरमहा दोन लाख युनिट वीज लागते. त्यातील ३०० ते ४०० युनिट वीज मिथेन वायूपासून मिळते. यावर २५ एमएलडीचा पंपहाऊस, स्ट्रीट लाईट्स, एअर ब्लोअर वापरले जातात. 

सध्या उन्हाळ्याच्या दिवसात या प्रकल्पात दररोज सरासरी २५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. उन्हाळा वगळता इतर हंगामात सरासरी ३५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होत असल्याचे मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक अभियंता संतोष यलगुलवार यांनी सांगितले. मिथेन वायूपासून दररोज ३०० ते ४०० युनिट वीज निर्मिती होते. यामुळे प्रकल्पाच्या वीज बिलात दरमहा ७२ ते ८० हजार रुपयांची बचत होत आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर दर महिन्याला २६ हजार युनिट वीजनिर्मिती होईल. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर वीज बिलात वर्षाला २० लाख रुपयांची बचत होईल, असा दावाही महापालिका प्रशासनाने केला आहे. 

कशी होते प्रक्रिया...- सहायक अभियंता संतोष यलगुलवार म्हणाले, सांडपाण्यावरील पहिल्या प्रक्रियेत कचरा, प्लास्टिक बॅग, वाळूचे कण अशा विविध प्रकारच्या वस्तू विलग होतात. त्यानंतर सांडपाणी काँबीट्रीट युनिटमध्ये येते. तिथून हे पाणी हवाबंद टाकीमध्ये (अ‍ॅनारॉबिक डायझेशन) घेतले जाते. या प्रक्रियेत मिथेन, कार्बनडाय आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईड, अमोनिया, आर्द्रता आदी घटक तयार होतात. या पाण्याचे विघटन झाल्यानंतर तयार झालेला स्लज (घाण चिखल) टाकीच्या तळाला बसतो. यातूनच कच्चा मिथेन वायू तयार होतो. हा कच्चा मिथेन शुध्द करण्यासाठी पुन्हा स्क्रबर टँकमध्ये घेतला जातो. स्क्रबरसाठी पाण्याचे दोन टँक वापरले जातात. आयर्न मीडीयासाठी चार टँक वापरण्यात आले आहेत. स्क्रबर करीत असताना त्यातून सल्फरडाय आॅक्साईड आणि कार्बनडाय आॅक्साईड हे पाण्यासोबत आणि आयर्न मीडीयासोबत निघून जातात. या टाकीतील शुध्द मिथेन वायू पुढे दोन टाक्यांमध्ये साठविला जातो. हा जमा झालेला गॅस जनरेटरला इंधन म्हणून वापरला जातो. त्यातून जनरेटर सेट कार्यान्वित होतात.  

सांडपाण्यापासून वीजनिर्मिती हा राज्यातील वेगळा प्रयोग आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर प्रकल्पाच्या वीजबिलात सरासरी २० टक्के इतकी बचत होऊ शकते. शिवाय सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा असा महापालिकेचा प्रयत्न आहे. शुध्द झालेले पाणी बागा, झाडांना दिले जात आहे. पुढील काळात खासगी बांधकामांना पाणी देण्याचे धोरण आखले जात आहे. वीजनिर्मिती आणि पुनर्वापरातून महापालिकेचा आर्थिक फायद होईल. - सुनीता हिबारे, उपअभियंता, महापालिका

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाmahavitaranमहावितरणPower ShutdownभारनियमनSmart Cityस्मार्ट सिटी