शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

सोलापूर/बार्शी बाजार समिती निवडणुक ; निवडणूक कर्मचाºयांना मताधिकार नाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 2:49 PM

बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाºयांना मतदान करता येणार नाही, असे निर्देश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.

ठळक मुद्देसहकार निवडणूक प्राधिकरणाने तशी सोय केलेली नाही. याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. माहेरवासिणीने जुनी ओळख पटवून द्यावीमाहेरवासिणीने जुनी ओळख पटवून द्यावी

सोलापूर : बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाºयांना मतदान करता येणार नाही, असे निर्देश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. याचा फटका सोलापूर आणि बार्शी बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत गुंतलेल्या २ हजारांहून अधिक कर्मचाºयांना बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे. 

 सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांचे दुसरे प्रशिक्षण शिवछत्रपती रंगभवन येथे झाले. यावेळी बाजार समितीच्या शेतकरी मतदार यादीत नावे समाविष्ट असलेल्या कर्मचाºयांनी आपल्या मतदानाचे काय? असा प्रश्न निवडणूक निर्णय अधिकाºयांना विचारला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना निवडणूक प्राधिकरणाने कर्मचाºयांना मतदान करण्याची तरतूद केली नाही, अशी माहिती दिली.

सहकार निवडणूक प्राधिकरणाने याबाबत निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये कुजबूज सुरु झाली. अनेक कर्मचाºयांनी दूरध्वनीवरुन पत्रकारांना याबाबत माहिती दिली. आम्हाला मतदानाचा अधिकार द्यायचा नव्हता तर मतदार यादीत नावे का समाविष्ट केली, असा प्रश्नही मतदान प्रक्रियेसाठी नेमलेल्या काही शिक्षकांनी उपस्थित केला.

याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे दाद मागू, असे शिक्षकांकडून सांगण्यात आले. शासकीय कर्मचाºयांना निवडणुकीत भाग घेता येत नाही . मात्र त्यांना मतदान करता येते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी सोयही करुन दिली आहे. परंतु, सहकार निवडणूक प्राधिकरणाने तशी सोय केलेली नाही. याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.

माहेरवासिणीने जुनी ओळख पटवून द्यावी- प्रशिक्षण कार्यक्रमात अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. सातबारा उताºयावर भागीदार म्हणून महिलांची नावे असतात. या नोंदीवरुन मतदार यादीत महिलांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदार यादीत अनेक महिलांची माहेरची नावे-आडनावे आली आहेत. त्या मतदानाला आल्या तर काय करायचे, असा प्रश्न कर्मचाºयांनी उपस्थित केला. त्यावर त्यांना माहेरच्या नावाने-आडनाव असलेले ओळखपत्र दाखवायला सांगावे. मतदान केंद्राध्यक्षाने याबाबत निर्णय घ्यावा, असेही प्रशासनाकडून सुचविण्यात आले. या निवडणुकीत टपाली मतदानाची तरतूद नाही तसेच निवडणूक कर्मचाºयांना मतदान करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. असे निवडणूक निर्णय अधिकारी  ज्योती पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक