भारतीय संस्कृतीचा प्रभाव जगभर : आपटे

By admin | Published: September 3, 2014 12:56 AM2014-09-03T00:56:46+5:302014-09-03T00:56:46+5:30

जनता बँक व्याख्यानमाला

Effect of Indian culture worldwide: Apte | भारतीय संस्कृतीचा प्रभाव जगभर : आपटे

भारतीय संस्कृतीचा प्रभाव जगभर : आपटे

Next


सोलापूर : योग, ध्यान साधना, आयुर्वेद, नृत्य, संगीत अशा भारतीय शास्त्रांना जगमान्यता मिळते आहे़ वर्तमान काळात या संस्कृतीचा प्रभाव जगभरात वाढल्याचे प्रतिपादन भारतीय संस्कृतीचे अभ्यासक मोहन आपटे यांनी केले़
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या बौद्धिक व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प मंगळवारी सायंकाळी रंगभवन सांस्कृतिक कार्यालयात ‘भारतीय संस्कृतीची जगमान्यता’ विषयावर आपटे यांनी गुंफले़ बँकेचे संचालक संजय माळी यांनी व्याख्यात्यांचे स्वागत केले़ प्रास्ताविक अशोक सरवदे यांनी केले़ सूत्रसंचालन आडव्याप्पा कडगंची यांनी केले़ प्रारंभी आपटे यांनी सिंध प्रांतातील संस्कृती स्पष्ट केली़ त्यानंतर तक्षशिला विद्यापीठ भस्मसात प्रकरण आणि योगासन या विषयावर विश्लेषण केले़ ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये रावळपिंडीजवळ तक्षशिला विद्यापीठ होते़ त्या ठिकाणी भगवान बुद्धांचा पुतळा आढळून आला आहे़ यावरुन भारतीय शिल्पशास्त्राची प्रगती आणि प्रचिती दिसून येते़
भारतीय योगासनावर बोलत असताना चित्तशुद्धीसाठी परदेशात योगासनावर जोर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले़ भारतीय योगाचा जगभर प्रसार होतोय़ योगावर महिलांचा मोठा प्रभाव आहे़ दरवर्षी योगासनमध्ये महिलांची संख्या ही २० टक्क्यांनी वाढली आहे़ व्हाईट हाऊसच्या प्रांगणात ओबामांनी योगासन गार्डन उभारले आहे़ जर्मनीमध्ये ३० लाख लोक योगासन करतात आणि त्यांना ८ लाख मार्गदर्शक मार्गदर्शन करीत असल्याचे सांगितले़

Web Title: Effect of Indian culture worldwide: Apte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.