सोलापुरातील महिलांनी साकारले तुरटीपासून इको फ्रेंडली बाप्पा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 03:01 PM2019-08-27T15:01:38+5:302019-08-27T15:06:17+5:30

बालकामगार प्रकल्पाचा पुढाकार; सहा इंच ते सव्वा फुटापर्यंतच्या मूर्ती केल्या तयार

Eco-Friendly Bappa from Solapur Women Realizes the Trumpet! | सोलापुरातील महिलांनी साकारले तुरटीपासून इको फ्रेंडली बाप्पा !

सोलापुरातील महिलांनी साकारले तुरटीपासून इको फ्रेंडली बाप्पा !

Next
ठळक मुद्देमधूर सोलापूरकर या पर्यावरणाबद्दल सजग असलेल्या मूर्तीकारांनी प्रथम शाडू व कागदाच्या लगद्याचा वापर करून या मूर्ती साकारल्याकाचेसारख्या दिसणाºया तुरटीच्या मूर्तीवर कागदी,सुती रंगीबेरंगी टिकल्या लावून सजविण्यात आले आहेतुरटीच्या मूर्ती घरच्या किंवा अपार्टमेंटच्या टाकीत सहज विसर्जन करता येते

यशवंत सादूल 

सोलापूर : पर्यावरणपूरक  गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासन व  पर्यावरणवादी संघटनांकडून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून काही पर्यावरणप्रेमी मूर्तीकारांनी शाडूचे,कागदाच्या लगद्यापासून गणपती बनविले आहेत. यंदा त्यामध्ये  नावीन्याची भर घालण्यात आली असून, बालकामगार प्रकल्पाच्या पुढाकाराने १५ बचत गटातील महिलांनी तुरटीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. मूर्तिकार मधूर सोलापूरकर यांनी या महिलांना हे बाप्पा साकारण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे.
शहर व जिल्ह्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि उपलब्ध जलस्रोतांचे पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जनातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तुरटीच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. 

मधूर सोलापूरकर या पर्यावरणाबद्दल सजग असलेल्या मूर्तीकारांनी प्रथम शाडू व कागदाच्या लगद्याचा वापर करून या मूर्ती साकारल्या; यंदा प्रथमच त्यांनी तुरटीचे गणेश साकारले आहेत. मागील चार-पाच महिन्यांपासून विविध प्रयोग केल्यानंतर त्याला यश मिळाले. 
काचेसारख्या दिसणाºया तुरटीच्या मूर्तीवर कागदी,सुती रंगीबेरंगी टिकल्या लावून सजविण्यात आले आहे.  तुरटीच्या मूर्ती घरच्या किंवा अपार्टमेंटच्या टाकीत सहज विसर्जन करता येते. त्यामुळे पाणी शुद्ध होते. बाळीवेस येथे या मूर्तींचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

जनजागृतीवर भर
- शिवकृपा आणि शिवगंगा बचतगटासह जवळपास  पंधरा बचत गटातील जवळपास ८० ते ९० महिला इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनवित आहेत. बालकामगार प्रकल्प त्यांना प्रशिक्षणासह विविध साहित्य पुरविते,त्यांच्या कामाला प्रोत्साहन देते. यातूनच मधूर सोलापूरकर यांनी यंदा तुरटीच्या मूर्ती साकारल्या आहेत. बालकामगार प्रकल्प संचालिका डॉ.अपर्णा कांबळे,रेखा जाधव,श्रीदेवी पाटील,उमा तेल्लूर,आनंदी विभूते, सुमती जोजारे,आरती आरगडे,वैशाली गुंड,सुनीता बायस, श्रुती वाळके,शेफाली विभूते या सर्व महिला इकोफ्रेंडली मूर्तीची निर्मिती करण्यासोबत पर्यावरण टिकण्यासाठी जनजागृती करीत आहेत

अशी बनते तुरटीची मूर्ती
- बाजारामध्ये उपलब्ध असणारी पांढरी तुरटी यासह स्फटिक आणि पिवळ्या रंगाची तुरटी अशा तीन प्रकारच्या तुरटीची एकत्र बारीक पावडर करून घेतली जाते. त्याला चांगला आकार येण्यासाठी त्यात खडीसाखरेचे मिश्रण केले जाते. मग हे सर्व मिश्रण पाण्यात उकळून घेतले जाते. त्यानंतर द्र्रवरूपातील हे मिश्रण घनरूपात साकार करण्यासाठी ते गणपतीच्या आकारमानाप्रमाणे साचामध्ये ओतून ठेवण्यात येते. आठ ते दहा तासांनी या तुरटीला गणेशाचे रूप येते. त्यानंतर त्यावर फिनिशिंग करून टिकल्या लावून सजावट करण्यात येते.

तुरटीच्या सहा ते आठ इंच आकाराच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. पहिल्यांदा हा प्रयोग केला असून सोलापुरातील वारंवार होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यावर उपयुक्त ठरावा या उद्देशाने या मूर्ती तयार केल्या आहेत. इतरांनाही प्रशिक्षण देणार आहे. 
-मधुर सोलापूरकर 
पर्यावरणपूरक महिला मूर्तिकार

Web Title: Eco-Friendly Bappa from Solapur Women Realizes the Trumpet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.