वाढत्या गर्दीमुळे पुणे-सोलापूर डेमू ट्रेन हडपसरहून सुटणार

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 1, 2023 13:05 IST2023-03-01T13:04:59+5:302023-03-01T13:05:31+5:30

पुणे -सोलापूर डेमू गाडी सकाळी ८.२५ ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरून ८.३६ वाजता सुटणार आहे.

Due to increasing crowd, Pune-Solapur DEMU train will depart from Hadapsar | वाढत्या गर्दीमुळे पुणे-सोलापूर डेमू ट्रेन हडपसरहून सुटणार

वाढत्या गर्दीमुळे पुणे-सोलापूर डेमू ट्रेन हडपसरहून सुटणार

सोलापूर - पुणे-सोलापूर डेमू ट्रेन (क्रमांक-११४२१ ) तसेच दौंड-पुणे डेमू (क्रमांक-०१५२२ ) या दोन गाड्या पुणे ऐवजी हडपसरहून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे रेल्वे स्थानकावर वाढती गर्दी तसेच गाड्यांची वर्दळ लक्षात घेऊन हा बदल केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पुणे -सोलापूर डेमू गाडी सकाळी ८.२५ ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरून ८.३६ वाजता सुटणार आहे. पुणे दौंड डेमू ट्रेन पुणे स्टेशनहून सकाळी ७.४० ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरून सकाळी ७.३६ वाजता सुटणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केली आहे.

Web Title: Due to increasing crowd, Pune-Solapur DEMU train will depart from Hadapsar