शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

इंधन दरवाढीमुळे वाहनांच्या किमती वाढण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:16 PM

सोलापूर : वाहन खरेदीचा विचार असेल तर घाई करा, कारण इंधन दरवाढीमुळे लवकरच चारचाकी वाहनांच्या किमतीत दोन टक्के वाढ करण्याच्या हालचाली कंपन्यांनी सुरू केल्या आहेत.इंधन दरवाढीमुळे चारचाकी वाहनांचे सुटेभाग व इतर बाबींच्या खर्चात वाढ झाली आहे. याशिवाय उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात वाहनांच्या किमतीत दीड ते दोन ...

ठळक मुद्देइंधन दरवाढीमुळे चारचाकी वाहनांचे सुटेभाग व इतर बाबींच्या खर्चात वाढवाहनांच्या किमतीत दीड ते दोन टक्का वाढ होईलपेट्रोल आणि डिझेलच्या दरात १0 ते १२ रुपयांची तफावत

सोलापूर : वाहन खरेदीचा विचार असेल तर घाई करा, कारण इंधन दरवाढीमुळे लवकरच चारचाकी वाहनांच्या किमतीत दोन टक्के वाढ करण्याच्या हालचाली कंपन्यांनी सुरू केल्या आहेत.

इंधन दरवाढीमुळे चारचाकी वाहनांचे सुटेभाग व इतर बाबींच्या खर्चात वाढ झाली आहे. याशिवाय उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात वाहनांच्या किमतीत दीड ते दोन टक्का वाढ केल्याशिवाय पर्याय नाही असे वाहन कंपन्यांनी वितरकांना कळविले आहे. त्यामुळे स्टॉकमधील वाहने प्रचलित किमतीत विकावीत. लवकरच दरवाढ कळविली जाईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वितरकांमध्ये गडबड सुरू झाली आहे. यामध्ये दुचाकी वाहनांच्या किमतीत अल्पशी वाढ होईल; मात्र चारचाकी व मालवाहू वाहनांच्या किमतीत  मोठा फरक येणार आहे. छोट्या कार पाच हजारांपासून पंचवीस हजारांपर्यंत महागण्याची चिन्हे आहेत. तर मालवाहू वाहनाच्या किमतीत ५ हजारांपासून ३५ हजारांपर्यंत वाढ असणार आहे. 

वाहनांच्या किमती वाढल्या की त्याप्रमाणे आरटीओचा कर वाढविला जातो. वाहनांच्या शोरुमच्या किमतीवरील हा कर आकारला जातो. किंमत पंचवीस हजारांपर्यंत वाढल्यास आरटीओचा कर काही प्रमाणात वाढणार आहे. ही रक्कम छोटी असली तरी आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत वर्षाखेर ही वाढ मोठी ठरणार आहे. विशेष म्हणजे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १0 ते १२ रुपयांची तफावत आहे. पेट्रोल वाहने स्वस्त असतात. इंधनाच्या किमतीतील फरकाचा विचार करता नागरिकांचा पेट्रोलची वाहने खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. 

वाहनाच्या एक्सशोरुमच्या किमतीवर आरटीओचा कर लावला जातो. वाहन कंपन्यांनी किमतीत वाढ केल्यास करात थोडा फरक पडेल.यामुळे आरटीओच्या महसुलात अल्पशी वाढ होईल यात शंका नाही.- बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसcarकारPetrolपेट्रोल