शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

आवक वाढल्याने सोलापूरातील डाळिंबाचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 11:58 IST

वाहतुकीला अडथळा : फळे डागाळल्यामुळे परराज्यात मागणी कमी

ठळक मुद्देसोलापूर बाजार समिती ही डाळिंब फळाच्या बाजारासाठी प्रसिद्धसोलापूर जिल्ह्यात एकूण २१ हजार २८९ क्षेत्रात डाळिंबाच्या बागा ११ तालुक्यातून दरवर्षी ८.८८ मेट्रिक टन डाळिंबाचे उत्पादन

संताजी शिंदे 

सोलापूर : डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले सोलापुरातील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या डाळिंब फळाची आवक वाढल्यामुळे दर घसरले आहेत. एरवी १०० ते १२० रुपये किलोने विकला जाणारा डाळिंब सध्या ४० ते ५० रूपये दराने मिळत आहे. बाजारात डागाळलेली फळे येत असल्यानेही मागणी कमी झाली आहे. 

सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती ही डाळिंब फळाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दररोज डाळिंबाचा व्यापार चालतो. सोलापूर जिल्ह्यात एकूण २१ हजार २८९ क्षेत्रात डाळिंबाच्या बागा आहेत. ११ तालुक्यातून दरवर्षी ८.८८ मेट्रिक टन डाळिंबाचे उत्पादन होत असते. बाजार समितीमध्ये दररोज ८ ते १० हजार कॅरेट (प्रति कॅरेट २० किलो) मालाची आवक होते.

 जिल्ह्याबरोबर उस्मानाबाद, बीड, विजयपूर, गेवराई, शहागड, अंबड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बारामती आदी भागातून डाळिंबाची मोठी आवक होते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दररोज मोठ्या प्रमाणात डाळिंबाची आंध्र प्रदेश, उडिशा आणि पश्चिम बंगाल येथे निर्यात होत असते. यंदा कमी-जास्त होणाºया पावसामुळे बाजारात डागाळलेला माल मोठ्या प्रमाणात येत आहे. गणेश आणि भगवा या दोन जातीपैकी भगवा डाळिंबाची सर्वात जास्त आवक होत आहे. 

आंध्र प्रदेश, उडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पाऊस जास्त असल्यामुळे सध्या वाहतुकीवरही परिणाम होत आहे. दर्जेदार फळे ४० ते ५० रुपये किलोने मिळत आहेत. डागाळलेले डाळिंब हे ३० ते ३४५ रुपये तर त्याच्यापेक्षा थोडा कमी दर्जाचा १००, १५० ते २०० कॅरेटने मिळत आहे. नेहमीपेक्षा ५० ते ६० टक्के दर कमी झाल्याने सध्या शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दर घसरल्याने शेतकरी अडचणीत...- बाजार समितीमध्ये दिवसाकाठी डाळिंबाची ६० ते ७० लाखांची उलाढाल होत असते. मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी आवक वाढली आहे. डाळिंब व्यापार गेल्या दोन महिन्यात तेजीत आला होता. वाढती आवक, डागाळलेला माल आणि कमी झालेली निर्यात, यामुळे डाळिंब व्यापार अचानक घसरला आहे. आंध्र प्रदेश, उडिशा, कोलकाता ही सोलापूरच्या डाळिंबाची मुख्य बाजारपेठ आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, अहमदनगर, सांगली, इंदापूर, जतसह कर्नाटकातील विजयपूर, इंडी आदी ठिकाणी उत्पादन होणारा डाळिंब सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतो. सध्या दर घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. 

सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाचा व्यापार दररोज चालतो. सोलापूरसह इतर जिल्ह्यातील शेतकरी आपला माल घेऊन येत असतात. सध्या अनियमित पावसामुळे डागाळलेला डाळिंब बाजारात येत आहे. शिवाय वाहतुकीची समस्या असल्याने निर्यात कमी होत आहे. याचा परिणाम व्यवसायावर झाला असून दर कमी झाले आहेत. - मन्सूर माडीवाले, डाळिंब व्यापारी, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, सोलापूर. 

तीन एकरात १२०० झाडे आहेत, खूप कष्ट आणि मेहनत घेऊन डाळिंबाची लागवड करावी लागते. मोठ्या अपेक्षेने डाळिंब बाजारात आणला होता, मात्र एकूण उत्पादन खर्चाच्या फक्त १० टक्के नफा झाला आहे. हीच स्थिती राहिली तर डाळिंबाच्या बागा काढून टाकाव्या लागतील. - नीलकंठ दळवी, शेतकरी, कर्जत, जिल्हा अहमदनगर. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarket Yardमार्केट यार्ड