शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

दराच्या घसरणीमुळे सोलापुरातील कांदा उलाढाल ३०० कोटींनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 18:45 IST

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांनी कष्टाने चांगले पीक घेतले असतानाही झाले मोठे नुकसान

ठळक मुद्देमलेशिया, सिंगापूर व इतर राष्टÑांना पाकिस्तानने चांगल्या प्रतीचा व कमी दराने कांदा पुरवलाआपल्याकडे एकाच वेळी व दुय्यम प्रतीचा कांदा बाजारात आलासोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक यावर्षी १३० टक्के झाली

अरुण बारसकर सोलापूर: सोलापूरबाजार समितीमध्ये यावर्षी कांद्याची आवक ९ लाख ३७ हजार क्विंटलने वाढली आहे. मात्र दराची घसरण सुरुच राहिल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास ३०० कोटींची उलाढाल घटली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये राज्यातून तसेच राज्याबाहेरील ५४ तालुक्यातील कांदा विक्रीसाठी येतो.

राज्यातील नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समितीप्रमाणेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीही कांदा  उलाढालीत अग्रभागी आहे.  यावर्षी राज्यभरातून तसेच बाहेरच्या राज्यातूनही सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आला. यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी कांद्याची आवक वाढली आहे. त्याचवेळी दरात मोठी घसरण झाल्याने बाजार समितीच्या उलाढालीत मोठी घट झाली तर शेतकºयांना कांद्यातून नुकसान सहन करावे लागले.

राज्यातील विविध भागातून कांदा विक्रीसाठी आला. वाहतुकीसाठीचा मोठा खर्च शेतकºयांना सोसावा लागला. कांद्याची प्रत चांगली असली तरी दोनशेपासून पाचशे रुपयांचा दर मिळाला. यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ आणि कांद्याचा पडलेला भाव यामुळे नेहमीच गृहिणींच्या डोळ््यात पाणी आणणाºया कांद्याने यंदा मात्र शेतकºयांच्या डोळ््यात पाणी आणले.

अनुदान जाहीर अन् दरात घट- नोव्हेंबरपासून कांदा दरात सुधारणा झाली नाही. उलट घटच झाल्याने राज्य शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले. अनुदान देण्याची घोषणा होताच बाजारात कांद्याच्या दरात आणखीन घट झाली. उच्च प्रकारच्या कांद्याला पाचशे ते ७०० रुपये असलेला दर अनुदान जाहीर केल्यानंतर तीनशे ते पाचशेवर आला. त्यानंतर यातही घसरणच झाली. 

सोलापूर बाजार समितीमधील आवक आणि उलाढालवर्ष    कांदा(क्विंटल)    उलाढाल(रुपयात)

  • २०१४-१५    ५३ लाख ३२ हजार    ४९८ कोटी ९७ लाख
  • २०१५-१६    ४५ लाख ९६ हजार    ५३४ कोटी ४१ लाख
  • २०१६-१७    ४७ लाख २७ हजार    २४० कोटी १५ लाख
  • २०१७-१८    ४८ लाख ५० हजार    ६२४ कोटी ३९ लाख 
  • २०१८-१९    ५७ लाख ८७ हजार    ३३२ कोटी ७६ लाख 

मलेशिया, सिंगापूर व इतर राष्टÑांना पाकिस्तानने चांगल्या प्रतीचा व कमी दराने कांदा पुरवला. आपल्याकडे एकाच वेळी व दुय्यम प्रतीचा कांदा बाजारात आला. सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक यावर्षी १३० टक्के झाली. कांद्याची निर्यातही झाली परंतु अधिक उत्पादनामुळे दरात वाढ झाली नसावी.- सिद्रामप्पा हुलसुरे, कांदा व्यापारी, सोलापूर बाजार समिती 

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीPakistanपाकिस्तान