पंढरपुरातील चंद्रभागा नदीत बुडून परराज्यातील भाविकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 15:59 IST2018-11-18T15:56:30+5:302018-11-18T15:59:26+5:30

पंढरपूर : कार्तिकीच्या यात्रा सोहळ्यासाठी तेलंगणा आलेला भाविकाचा चंद्रभागेत स्नान करताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या भाविकाचे ...

Due to the death of a devotee in the river Chandrabhaga in Pandharpur | पंढरपुरातील चंद्रभागा नदीत बुडून परराज्यातील भाविकाचा मृत्यू

पंढरपुरातील चंद्रभागा नदीत बुडून परराज्यातील भाविकाचा मृत्यू

पंढरपूर : कार्तिकीच्या यात्रा सोहळ्यासाठी तेलंगणा आलेला भाविकाचा चंद्रभागेत स्नान करताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या भाविकाचे सायान्ना बायकडी ( रा. किसकुंडा, जिल्हा कामर्डी, राज्य तेलंगणा) असे नाव आहे.

कार्तिकीच्या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत आहेत. पंढरपुरात आलेला प्रत्येक भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागे स्नान करत असतो. त्याचप्रमाणे चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरा जवळ पत्र स्नान करण्यासाठी सायान्ना बायकडी ( रा. किसकुंडा, जिल्हा कामर्डी, राज्य तेलंगणा) गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Web Title: Due to the death of a devotee in the river Chandrabhaga in Pandharpur