शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

विजयाच्या आत्मविश्वासामुळेच गतवेळच्या लोकसभेत पराभव : सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:26 IST

मंद्रुप : सन २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्याच्या आत्मविश्वासामुळे आपला पराभव झाल्याचे मान्य केले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ...

ठळक मुद्देमंद्रुपमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केली भावनाकाँग्रेसने आजवर साधलेला विकास जनतेपर्यंत पोहोचवावा - शिंदेआता ही एकजूट आगामी लोकसभा निवडणुकीतही कायम राखावी - शिंदे

मंद्रुप : सन २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्याच्या आत्मविश्वासामुळे आपला पराभव झाल्याचे मान्य केले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे मल्लिकार्जुन व  विश्वनाथ शेगावकर यांच्या शेतामध्ये हुरडा पार्टी कार्यक्रमात ही भावना व्यक्त केली.

यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राजशेखर शिवदारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, नगरसेवक चेतन नरोटे, उपसभापती श्रीशैल नरोळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, राष्ट्रवादीचे आप्पाराव कोरे, चंद्रकांत सुर्वे, भीमाशंकर जमादार आदी व्यासपीठावर होते. 

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत दक्षिणच्या नेत्यांनी एकजूट दाखविल्याने काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. आता ही एकजूट आगामी लोकसभा निवडणुकीतही कायम राखावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सध्या देशभरात भाजपविरोधात लाट आहे. याचा फायदा घेऊन कार्यकर्त्यांनी काँग्रेसने आजवर साधलेला विकास जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. दक्षिण तालुक्यातील कमळे गुरुजी, वि.गु. शिवदारे, आनंदराव देवकते यांची आठवण त्यांनी यावेळी केली. त्यांच्या शब्दात ताकद होती, अशा शब्दात त्यांनी उल्लेख केला.  

सतीश पाटील, जाफरताज पाटील, महेश पाटील, रमेश आसबे, सरपंच रावसाहेब पाटील, मुंजप्पा कोले, अर्जुन टेळे, विश्वनाथ शेगावकर, मल्लिकार्जुन शेगावकर, बसवराज शेगावकर, काशिनाथ सोरेगावकर यांच्यासह वांगी, हत्तूर, वडकबाळ, मनगोळी, अकोले, गुंजेगाव, कंदलगाव, गावडेवाडी, अंत्रोळी व वडापूर गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

दबावाचे राजकारण- माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला असताना गेली लोकसभा व विधानसभेत दुसºया पक्षातील लोकांनी शिरकाव केला. चार वर्षांत देशात दबावाचे राजकारण चालले, असा आरोप त्यांनी के ला. शेळके यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणElectionनिवडणूक