शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 16:11 IST

सोलापूर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या आहेत. शासन परिपत्रक न मिळाल्यामुळे अद्याप बदल्यांची प्रक्रिया ...

ठळक मुद्देग्रामविकास विभागाने २१ मे रोजी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांतर्गत परिपत्रक जारी केले आहे.२५ मेपर्यंत बदलीपात्र शिक्षकांची माहिती संगणक प्रणालीत नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार

सोलापूर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या आहेत. शासन परिपत्रक न मिळाल्यामुळे अद्याप बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली नसली तरी प्रशासनाने तयारी केली आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेमधील विविध विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची मे अखेर तयारी करण्यात येते. यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया लांबली आहे. शासनाने बदल्यांबाबतचे परिपत्रक जारी केले असले तरी अद्याप जिल्हा परिषदेला मिळाले नसल्याची माहिती प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली. असे असले तरी प्रशासनाने सर्व विभागांकडून बदलीपात्र कर्मचाºयांची यादी मागविलेली आहे. आचारसंहितेचा अंमल संपल्यानंतर बदली प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे बदलीपात्र कर्मचारी व अधिकाºयांची धावपळ वाढली आहे.

ग्रामविकास विभागाने २१ मे रोजी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांतर्गत परिपत्रक जारी केले आहे. २५ मेपर्यंत बदलीपात्र शिक्षकांची माहिती संगणक प्रणालीत नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यानंतर ही सुविधा बंद होणार आहे. त्यानंतर ३0 मेपर्यंत शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गेल्या वेळेस संगणक प्रणालीत बदल्यांवरून गोंधळ झाला होता. या वेळेस सर्व शिक्षकांचे मॅपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला फक्त बदलीपात्र नव्हे तर सर्व शिक्षकांची माहिती संकलित करावी लागणार आहे.

‘त्या’ शिक्षकांना मिळेल न्याय- चुकीची माहिती भरून मागील वर्षी बदली करून घेतलेल्या दोषी शिक्षकांना संगणक प्रणालीत मॅप करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कारवाई केली असेल तर त्या शिक्षकांना या सुविधेत मॅप करू नये. त्या शिक्षकांसंबंधीत शाळेची एक जागा रिक्त दाखविणे गरजेचे आहे. गतवेळेसारखे यावर्षी शिक्षक बदलीत गोंधळ होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरTransferबदलीSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजनाsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढा