दारूच्या नशेत पतीची पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST2021-06-01T04:16:53+5:302021-06-01T04:16:53+5:30

शिरभावी येथील सचिन मेटकरी यास दारूचे व्यसन असून, तो दारूच्या नशेत घरातील लोकांना शिवीगाळ, मारहाण करीत असे. २८ मे ...

Drunk husband beats wife | दारूच्या नशेत पतीची पत्नीला मारहाण

दारूच्या नशेत पतीची पत्नीला मारहाण

शिरभावी येथील सचिन मेटकरी यास दारूचे व्यसन असून, तो दारूच्या नशेत घरातील लोकांना शिवीगाळ, मारहाण करीत असे. २८ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास मनीषा घरात स्वयंपाक करीत असताना पती सचिन हा मटन घेऊन घरी आला. ते मटन मनीषा लाकडी पाट्याच्या विळीने चिरत होती. त्यावेळी सचिन मोबाईलवरून कोणाला तरी शिवीगाळ करत, तू फोनवर बोल असे म्हणून फोन तिच्यासमोर केला. तिने फोनवर बोलण्यास नकार दिल्याने चिडून पत्नी मनीषाला अर्वाच्य शिवीगाळ करून मटन चिरत असलेली विळी हातात घेऊन लाकडी पट्टीच्या बाजूने तिच्या डोक्यात मारण्यास सुरुवात केली. ती जोरात ओरडल्याने सासू-सासरे घरी पळत आले. त्यांनी सुनेला सचिनच्या तावडीतून सोडवून घराबाहेर नेले. त्यावेळी सचिनने सासू-सासऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर मारण्यास धावून आल्याने सर्वजण घरातून बाहेर पळून गेले. त्यानंतर तो आम्हाला मारहाण करेल या भीतीपोटी आम्ही घरी गेलो नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Drunk husband beats wife