शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी सोलापूर जिल्हा ; मोफत पासबरोबर आता परीक्षा शुल्कही होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:59 IST

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा: उच्च तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेशशालेय विद्यार्थ्यांना एस.टी.ची मोफत पास सुविधा जाहीर करुन अंमलातव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आकारलेले परीक्षा शुल्क माफ  होणार

सोलापूर:  खरीप हंगाम २०१८-१९ साठी राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करुन शासनाने शालेय विद्यार्थ्यांना एस.टी.ची मोफत पास सुविधा जाहीर करुन अंमलात आणली. त्यानंतर दुष्काळ घोषित केलेल्या मंडलातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचेही परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय मंगळवारी राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांंतील विद्यार्थ्यांना होणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश झाला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण सोलापूर, मोहोळ, करमाळा, अक्कलकोट, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आकारलेले परीक्षा शुल्क माफ  होणार आहे. 

यंदा सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने दगा दिल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील एकूण १८० तालुक्यांतील २६८ महसुली मंडलांमध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये परीक्षा शुल्कमाफीची योजना लागू झाली आहे. याबरोबरच यापुढे २०१८ मध्ये महसूल व वनविभागाने अन्य तालुक्यांमध्ये किंवा मंडलांमध्ये तेथीलही विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची योजना लागू होईल, असे उच्च तंत्र शिक्षण विभागाने परिपत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या गावातील विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेने व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने कोणत्याही स्वरूपाचे परीक्षा शुल्क आकारू नये, असेही आदेशात म्हटले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शासनाने जाहीर केलेल्या तंत्र शिक्षणाच्या अधिपत्याखालील विद्यार्थ्यांना या परीक्षा शुल्क माफी योजनेचा लाभ होणार आहे.

 पुरावा जोडणे बंधनकारक

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावातील रहिवासाचा पुरावा जोडून संबंधित संस्थेकडे देणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्त भागातील ज्या विद्यार्थ्यांकडून संबंधित संस्थेने परीक्षा शुल्क आकारले आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत करावे, असा आदेश शिक्षण संस्थांना शासनाने जारी केला आहे.

यांना पन्नास टक्के शुल्क माफच्जे विद्यार्थी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शुल्क माफ करावे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा फी भरली नसेल त्यांनी १५ दिवसात भरावी, असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठdroughtदुष्काळ