शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सकाळपासून रिमझिम पाऊस, दुपारनंतर जोरदार बॅटिंग; ७ दिवसांत १४६ टक्के नोंद

By appasaheb.patil | Updated: June 11, 2024 18:03 IST

सोलापूर शहरात सोमवारी रात्री अकरा वाजेपासून मंगळवारी दुपारचे दोन वाजले तरी पावसाची संततधार सुरू आहे

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: आज मंगळवार सकाळपासूनच सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र दुपारनंतर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दुपारी तीननंतर पावसाने शहरात जोरदार बॅटिंग सुरू केली. यंदा रोहिणी व  मृग नक्षत्रात सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. मागील सात दिवसात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सोलापूर जिल्ह्यात मागील आठवड्याभरात १४६.५८ म्हणजेच सरासरी १५०.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. त्याबाबतची आकडेवारी मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली.

उजनी धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यासोबतच सीना व भीमा नदीक्षेत्रात पडलेल्या पावसामुळं नद्यांना चांगले पाणी आले आहे. जिल्ह्यातील ओढे, नाले, धरणं भरून वाहत आहेत. बार्शी, पंढरपूर, सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सांगोला आदी तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. सोलापूर शहरानंतर दुष्काळी माळशिरस तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस मंगळवेढा तालुक्यात पडला आहे.

सोलापूर शहरात सोमवारी रात्री अकरा वाजेपासून मंगळवारी दुपारचे दोन वाजले तरी पावसाची संततधार सुरू आहे. त्यानंतर म्हणजेच दुपारी तीन वाजेनंतर सोलापुरात पावसाने चांगलाच जोर धरला. या पावसाच्या पाण्यामुळे शहरातील विविध भागात पाणीच पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसSolapurसोलापूर