पोलिसी खाक्यानं चालकाची कबुली; होय, अपघात घडवून केला खून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST2021-05-26T04:22:59+5:302021-05-26T04:22:59+5:30
करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप तळपे, नितीन चव्हाण, सागर शेंडगे यांनी ...

पोलिसी खाक्यानं चालकाची कबुली; होय, अपघात घडवून केला खून!
करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप तळपे, नितीन चव्हाण, सागर शेंडगे यांनी २४ तासांत ही घटना उघडकीस आणली आहे. रविवारी पहाटे फिरायला गेल्यानंतर एका अज्ञात वाहनाने धडक दिली असा बनाव रचण्यात आला होता. पण, पोलिसांनी शिताफीने तपास करत तसेच गोपनीय माहितीच्या आधारे ज्या पिकअपने धडक दिली त्या पिकअप मालकापर्यंत पोहोचले. तर रात्रीच्या वेळीही पिकअप चालकाकडे असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून तपासाचे धागेदोरे वेगात फिरवली. चालकाची अधिक माहिती तसेच गोपनीय माहितीच्या आधारे चौकशी केल्यानंतर अक्षय ढावरे या चालकावर संशय बळावला. त्याला पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच अपघात घडविल्याचे त्याने कबूल केले. त्यावरून आता गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी नेमके कारण शोधणे सुरू आहे.
-----