धावत्या टेम्पोला रिक्षाची धडक दिल्याने चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:27 IST2021-08-17T04:27:57+5:302021-08-17T04:27:57+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर, पुणे येथील लष्कर कुटुंबीय १५ ऑगस्ट रोजी नातवाचे जावळ काढण्यासाठी रिक्षाने ...

The driver was killed on the spot when the rickshaw hit the speeding tempo | धावत्या टेम्पोला रिक्षाची धडक दिल्याने चालक जागीच ठार

धावत्या टेम्पोला रिक्षाची धडक दिल्याने चालक जागीच ठार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर, पुणे येथील लष्कर कुटुंबीय १५ ऑगस्ट रोजी नातवाचे जावळ काढण्यासाठी रिक्षाने तुळजापूरकडे निघाले होते. दुपारी साडेबारा वाजता त्यांची रिक्षा (क्र. एम.एच. १२ के.आर. ०९५३) मोहोळ तालुक्यातील हिवरे गावच्या शिवारात आली होती. यावेळी रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची रिक्षा महामार्गाने सोलापूरच्या दिशेने निघालेल्या टाटा टेम्पोच्या (क्र. टी.एन. ८७ बी. ५३५५) पाठीमागील बाजूवर आदळली.

या अपघातात बाळासाहेब पंढरी आगावणे (रा. लोणी काळभोर, पुणे) हे ठार झाले, तर माधुरी सोमनाथ लष्कर वय २८ वर्षे, सोमनाथ बाबूराव लष्कर ३५ वर्षे, लता बाबूराव लष्कर ४५ वर्षे, बाबूराव दुर्गा लष्फर ५४ वर्षे, हर्ष सोमनाथ लष्कर दीड वर्षे (सर्व रा. लोणी काळभोर, पुणे) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वाटेतच उपचारापूर्वी रिक्षाचालक बाळासाहेब पंढरी आगावणे याचा मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांत गुन्हा करण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

----

Web Title: The driver was killed on the spot when the rickshaw hit the speeding tempo