वाहनचालकानं अचानक दरवाजा उघडला; दुचाकीस्वार रोडवर कोसळून जखमी
By रवींद्र देशमुख | Updated: May 2, 2024 20:11 IST2024-05-02T20:10:58+5:302024-05-02T20:11:44+5:30
दोघेही शुद्वीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वाहनचालकानं अचानक दरवाजा उघडला; दुचाकीस्वार रोडवर कोसळून जखमी
रवींद्र देशमुख, सोलापूर : महावीर चौकात थांबलेल्या चारचाकी वाहनचालकानं अचानक दरवाजा उघडला अन् रोडवरुन धावणारा दुचाकीस्वारास तो दरवाजा धडकल्याने रोडवर पडून दोघे जखमी झाले. गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ओंकार मल्लिकार्जुन केंगनाळकर (वय- १७), मल्लिकार्जुन बसवराज केंगनाळकर (वय- ४५, रा. अशोक चौक, सोलापूर) अशी दोघा जखमींची नावे आहेत.
यातील जखमी दोघे पिता-पूत्र गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास डीसी कॉर्नर ते महावीर चौक या मार्गावरुन दुचाकीवरुन निघाले होते. महावीर चौकात चारवाहन वाहन रस्त्याच्या बाजूला उभे होते. चालकाने अचानक दरवाजा उघडला आणि त्याच दरम्यान दुचाकीवरील दोघे रस्ता पास करताना दरवाजा लागल्याने दोघेही रस्त्यावर कोसळले. यात दोघांनाही तोंडास, हातापायास, खांद्याला जखम झाली. त्यांना मित्र सैफन शेख याने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघेही शुद्वीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.