शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्न अन् वास्तव...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 14:58 IST

स्वप्नं पाहणं गैर नाही. पण ती साकार करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष ठाऊक नसणं गैर आहे.

एकदा काही कामानिमित्त महाविद्यालयात जाण्याचा योग आला. महाविद्यालयीन तरुणांची भेट झाली. संवाद झाला. मी सहज एकाला विचारलं, ‘कॉलेज संपल्यानंतर काय करणार आहेस पुढे ? ‘माझ्या  प्रश्नाने तो तरुण फारच उल्हासित झाला. ‘ खरं सांगू सर, तुम्हाला म्हणून सांगतो. आपल्याला हे असलं नोकरी वगैरे काही करायचं नाही. मला एक सिनेमा करायचाय. सैराटसारखा. एकच चित्रपट करायचा आणि कोट्यधीश नो झंझट, एक भन्नाट स्टोरी आहे माझ्या डोक्यात.. ‘मला ते बोलणं फारच स्वप्नाळू वाटलं. मी विचारलं, ‘चित्रपट क्षेत्रातला काही अनुभव आहे का तुला?’ यावर तो तरुण सहजपणे उद्गारला, ‘अनुभब कशाला लागतोय? सगळं माझ्या डोक्यात फिट आहे सर.’ मी म्हटलं, ‘मित्रा, कुठलंही यश इतक्या सहज मिळत नसतं.

तू अगोदर यशस्वी माणसांची चरित्रे वाच, त्यांनी किती प्रचंड संघर्ष केला हे तुला कळेल.’  माझा सल्ला बहुधा त्या तरुणाला पटला नसावा. त्याच्या चेहºयावरून जाणवलं. मी हस्तांदोलन करून काढता पाय घेतला. आजकाल अशी बिनबुडाची स्वप्नं उराशी बाळगणारी खूप मुलं दिसतात. स्वप्नं पाहणं गैर नाही. पण ती साकार करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष ठाऊक नसणं गैर आहे. आपणाला अमूक ठिकाणी पोहोचायचं आहे. याचे केवळ भान असणं गरजेचं नाही. तो तिथंपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि त्यासाठी कराव्या लागणाºया संघर्षाची मानसिक तयारी असणं आवश्यक आहे. कुठल्याही प्रयत्नाशिवाय आपण तिथं सहजपणे पोहोचू असा फाजील आत्मविश्वास काहीच कामाचा नाही. ही एकप्रकारे स्वत:ची फसवणूक आहे.

मला आठवतं, सोलापुरात शिक्षण घेत असताना वक्ता बनण्याचं फॅड माझ्या डोक्यात होतं. डॉ. निर्मलकुमार फडकुले, विवेक घळसासी यांच्यासारख्या वक्त्यांची भाषणे ऐकल्यानंतर मलाही वाटायचं की आपणही अशा सभा गाजवायला हव्यात. मग मी व माझा एक मित्र वक्तृत्व स्पर्धेला जाऊ लागलो. एकदा एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आम्ही एक स्क्रिप्ट तयार केली व मार्गदर्शन घेण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत डॉ. फक्रूद्दीन  बेन्नूर सरांच्या घरी गेलो. सरांनी स्किप्ट वाचली व आमची जोरदार कानउघडणी केली. वक्ता होणं म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव करणं नव्हे. चांगलं बोलायचं असेल तर तशी साधना हवी, वाचन हवं. निरीक्षण हवं. आकलन हवं. मांडणी स्वत:ची असायला हवी. अशा अनेक बहुमोल टिप्स सरांनी दिल्या. आम्ही भानावर आलो. जाणवलं की, ही एक दीर्घ साधना आहे.

स्वप्नाला प्रयत्नांची डूब नसेल तर ते दिवास्वप्न बनतं. खरं तर तरुणांनी स्वप्नं जरूर पहावीत. डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम तर नेहमी सांगायचे की, मोठी स्वप्ने पाहा. पण स्वप्नं पाहताना वास्तवाची जाणीवही हवी. आपण जे स्वप्न पाहतोय, ते साध्य होण्यासाठी आपणाला काय करायला हवं याचं नियोजन हवं. रोड मॅप हवा. त्या दिशेने अविरत प्रयत्न हवेत. आज अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची स्वप्ने पाहतात. पण अभ्यासाकडे मात्र पाठ फिरवतात. दरवेळेस जाहिरात आली की फॉर्म भरण्याचा अतोनात उत्साह आणि परीक्षेच्या दिवशी तयारी झाली नसल्याने सरळ दांडी. अशाने काहीच साध्य होत नाही. आपण फक्त स्वत:ला फसवत राहतो. 

प्रयत्नामध्ये एक आनंद असतो. फळ हे मिळतंच असतं. पण त्याचाच अधिक विचार करु नये. शेतकरी कसा दरवर्षी नव्या उमेदीने पेरत राहतो. पुढे पाऊस पडेल की दुष्काळ त्याला ठावूक नसतं. पण तो पेरणं सोडत नाही. तो पेरण्यातला आनंद उपभोगत राहतो. अशा निरपेक्ष आनंदालाच पुढे फलप्राप्तीचे धुमारे फुटत असतात. तसा आपण स्वप्नांचा पाठलाग करत रहावा. स्वप्न आवाक्यातलं असावं आणि ते कवेत घेण्यासाठी आपण आकांताने धावत सुटावं. पाय रक्तबंबाळ होतील. तहानभूक हरपेल. एक क्षण असे वाटेल की, ‘ये अपने बस की बात नही’. पण तरीही न डगमगता ‘करा किंवा मरा’ च्या भूमिकेतून आपण संघर्ष करावा आणि मग निश्चितपणे एक क्षण आपला येतोच. स्वप्नपूर्तीचा. ध्येयप्राप्तीचा. आपल्याही नकळत आपण एका उंचीवर पोहोचलेलो असतो. झालेल्या जखमांवर केव्हाच कर्तृत्वाची खपली धरलेली असते. आपले आप्त आपल्याकडे कौतुकाने पाहत असतात. एकेकाळचं आपलं स्वप्न सत्य होऊन आपल्या गळ्यात विजयमालेसारखं विराजमान झालेलं असतं. हा एक सार्थकतेचा क्षण असतो. तो गाठायचा असेल तर आतापासूनच सुरुवात करायला हवी. तेव्हा मित्रांनो... गो अहेड...!!- डॉ. प्रेमनाथ रामदासी(लेखक हे शिक्षक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा