पंढरपुरात कोरोना रुग्णांचे द्विशतक पूर्ण; सोमवारी आढळले ५० जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 21:00 IST2020-07-20T20:59:08+5:302020-07-20T21:00:17+5:30
१२० जणांचे प्रलंबित अहवाल; आरोग्य विभाग झाला सतर्क

पंढरपुरात कोरोना रुग्णांचे द्विशतक पूर्ण; सोमवारी आढळले ५० जण बाधित
पंढरपूर : सोमवार २० जुलै रोजी २०३ कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल आला आहे. त्यामध्ये ८१ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर ५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. यामुळे पंढरपुरातील एकूण बाधितांची संख्या २११ झाली आहे.
२० जुलैपर्यंत १ हजार ७८१ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १६६१ लोकांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये १४५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचबरोबर १२० जणांचे तपासणी अहवाल प्रलंबीत आहेत. तर २११ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड केअर सेंटरमध्ये १२५ जणांवर तर उपजिल्हा रुग्णालयात २३ जणांवर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर सोलापूर - १२, पुणे - १, अकलूज - १, मंगळवेढा १ असे एकूण १५ जण उपचार घेत आहेत.
दरम्यान, रुग्णालयातून बरे होऊन घरी केलेल्या बाधितांची संख्या ४६ आहे. त्याचबरोबर २०५ लोकांना संस्थात्मक कॉरंटाईन करुन ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
आज या भागात सापडले कोरोना पॉझिटिव्ह
कालिका देवी चौक, संतपेठ, गांधी रोड, इसबावी, जुनीपेठ रामबाग रोड, आनंद नगर, श्रीराम नगर, मनीषा नगर, महावीर नगर, घोंगडे गल्ली, पोलीस लाईन, उमदे गल्ली, काशी कापडी गल्ली, लक्ष्मीनगर, रोहिदास चौक, हरिनारायण पार्क, ग्रामीण भागामध्ये भोसे, तारापूर, भटूबरे या गावांचा सहभाग आहे.