गाडीचा दरवाजा उघडला अन्‌ नऊ लाखांचा गुटखा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:11 IST2021-01-08T05:11:04+5:302021-01-08T05:11:04+5:30

माळशिरस : संशयीतरीत्या धावणारे वाहन गस्तीवरील पोलीस पथकाने अडविले. गाडीचा दरवाजा उघडताच आतमध्ये नऊ लाख ११ हजारांचा गुटखा सापडला. ...

The door of the car was opened and a gutka worth Rs 9 lakh was found | गाडीचा दरवाजा उघडला अन्‌ नऊ लाखांचा गुटखा सापडला

गाडीचा दरवाजा उघडला अन्‌ नऊ लाखांचा गुटखा सापडला

माळशिरस : संशयीतरीत्या धावणारे वाहन गस्तीवरील पोलीस पथकाने अडविले. गाडीचा दरवाजा उघडताच आतमध्ये नऊ लाख ११ हजारांचा गुटखा सापडला.

माळशिरस पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने खुडूसजवळ ही कारवाई केली.

खुडुस गावच्या हद्दीत आसरा ढाब्यानजीक पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड हे पोलीस पथकासह गस्त घातील होते. सकाळी ११ .४५ वाजता रस्त्याने एक जीपगाडी येत होती. या जीपचा संशय आल्याने त्यांनी ती थांबवून पाहाणी केली. त्यात गुटखा आणि पानमसाला आढळला. विमल पानमसाला ४८ हजार , व्ही टॉबेको १ लाख ४४ हजार, विमल पानमसाला ७९ हजार २००, व्ही टॉबेको १२ हजार पानमसाला ३७ हजार ४०० , आरएमडी ८६ हजार ४०० , सेंटेड टॉबेको ७२ हजार, असा एकूण ९ लाख ११ हजार रुपये किमतीचा माल व ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन जप्त केले. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत सापडलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कारवाईत उपनिरीक्षक आदिनाथ महानवर, सचिन डुबल, गणेश गायकवाड, सुशांत साळुंखे या पथकाने केली.

---

फोटो : ०७ माळशिरस

गुटखा व तंबाखूसह माल ताब्यात घेताना पोलीस पथक.

Web Title: The door of the car was opened and a gutka worth Rs 9 lakh was found