शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हेरिटेज वास्तू पाडू नका, ‘वस्त्रोद्योग’ला वाढीव एफएसआय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:07 IST

शिवसेनेचा सभासद प्रस्ताव : सोलापूर महापालिका सभेत भाजप नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष

ठळक मुद्देमहापालिकेची सर्वसाधारण सभा सहा आॅगस्ट रोजी होणार एन.जी. मिलच्या सात एकर जागेवर पाच ते सात हेरिटेज इमारती वस्त्रोद्योग महामंडळाने इमारतींच्या पाडकामाची निविदा काढली

सोलापूर : नरसिंग गिरजी मिलच्या जागेवरील हेरिटेज इमारतींचे पाडकाम करुन मिलची जागा विक्री करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला असला तरी शिवसेनेच्या नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. महापालिकेने वस्त्रोद्योग महामंडळाला सात एकर जागेच्या बदल्यात वाढीव एफएसआय किंवा टीडीआर द्यावा. मिलची जागा वापरात यावी यासाठी विविध पर्यायांचा विचार व्हावा, असा सभासद प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला आहे. 

महापालिकेची सर्वसाधारण सभा सहा आॅगस्ट रोजी होणार आहे. या सभेची पुरवणी विषयपत्रिका प्रसिध्द करण्यात आली आहे. एन.जी. मिलच्या सात एकर जागेवर पाच ते सात हेरिटेज इमारती आहेत. वस्त्रोद्योग महामंडळाने इमारतींच्या पाडकामाची निविदा काढली आहे. त्याला इंट्याकसह कृती समितीने विरोध केला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभासद प्रस्ताव दिला आहे. हेरिटेज वास्तूंमध्ये टेक्स्टाईल कॉर्पाेरेशनचे कार्यालय व्हावे, टेक्स्टाईल क्षेत्रात झालेली स्थित्यंतरे दर्शविणारे आधुनिक संग्रहालय व्हावे, प्रशिक्षण संस्था व्हावी, असे सूचविण्यात आले आहे. शिवाय या जागेची विक्री करण्याऐवजी कुर्डूवाडी येथे मंजूर असलेले रेल्वे वर्कशॉप किंवा मोठे व्यापारी संकुल व्हावे, असेही सूचविण्यात आले आहे. हेरिटेज वास्तू वाचविण्यासाठी वस्त्रोद्योग महामंडळाला अतिरिक्त एफएसआय आणि टीडीआर देण्याचा प्रस्ताव या सभेत मांडण्यात आला आहे. हेरिटेज वास्तूंचे पाडकाम करुन जागा विक्री करण्याचा निर्णय सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी याला विरोध केल्यामुळे भाजपचे नगरसेवक या प्रस्तावावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे. 

उड्डाण पूल भूसंपादनाचा मार्ग मोकळा- शहरातील दोन उड्डाण पुलांसाठी बाधित होणाºया जागांची मनपा आणि भूसंपादन कार्यालयामार्फत संयुक्त मोजणी होणार आहे. मोजणीचे शुल्क महापालिकेने भरायचे आहे. यासाठी मनपा सभेची मंजुरी आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी जून महिन्यात याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. परंतु, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाºयांनी तो वेळेत सभेच्या अजेंड्यावर घेतला नाही. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर सभेच्या पुरवणी विषयपत्रिकेत हा विषय घेण्यात आला आहे. 

राणी अवंतीबाई लोधी यांचा पुतळा उभारा- राणी अवंतीबाई लोधी यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणाची आहुती दिली. झाशीच्या राणीप्रमाणेच त्यांनीही १८५७ मध्ये मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्याची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी लोधी गल्ली बेडरपूल लगत राणी अवंतीबाई  लोधी यांचा पुतळा उभारण्यात यावा, असा सभासद प्रस्ताव नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, रवी कैय्यावाले यांनी मांडला आहे.  

सोशल एज्युकेशन संस्थेत दोन सदस्यांची नियुक्तीमहापालिकेने सोशल एज्युकेशन संस्थेला नाममात्र किमतीने जागा दिली आहे. जागेची खरेदी देताना या संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये महापालिकेचे दोन सदस्य असावेत, अशी अट घालण्यात आली होती. एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे पत्र या अटी व शर्तीप्रमाणे दोन सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्तावही सभेसमोर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर