रोज दहा मिनिटे विपश्यना करा; खाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:01+5:302021-05-24T04:21:01+5:30
अक्कलकोट : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी रोज दोन वेळा किमान दहा मिनिटे विपश्यना साधना करावी. यामुळे शरीरातील नकारात्मक्ता नष्ट होऊन ...

रोज दहा मिनिटे विपश्यना करा; खाडे
अक्कलकोट : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी रोज दोन वेळा किमान दहा मिनिटे विपश्यना साधना करावी. यामुळे शरीरातील नकारात्मक्ता नष्ट होऊन सकारात्मक भावना तयार होते. असे आवाहन साधनाकर्ते रमेश खाडे यांनी केले.
शनिवारी दुपारी खाडे यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, म्हाडा कॉलनी या दोन्ही ठिकाणच्या क्वारंटाइन सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधून ‘विपश्यना विद्या’ विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, समनव्यक परमेश्वर किणगी, डॉ. श्रीकांत शिंदे, कर्मचारी आय. एम. काझी, आकाश कांबळे, प्रदीप पोमाजी, परमेश्वर काळे, मिलिंद शिंगाडे, अमोगसिद्ध वंजारे, टी. ए. नाईकवाडी, सेविका वाघमोडे यांची उपस्थिती होती.
यावेळी पोलीस निरीक्षक गवळी यांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा विचार करत न बसता रोज आशा प्रकारची साधना करून जीवनाचा आनंद घेण्याचे आवाहन केले. माणसाने दुःखात असो वा सुखात नेहमी सकारात्मक विचार करा. यामुळे मानसिक स्थिती प्रबळ होत असल्याचे सांगितले.
दोन्ही सेंटरमध्ये दोनशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. दोन्ही ठिकाणी हे प्रबाेधन झाले. सकारात्मक जीवन जगण्यासाठी गुरुकिल्ली मिळाल्याचा आनंद अनेक रुग्णांनी व्यक्त केला.
---
फोटो : २३ अक्कलकोट
अक्कलकोट येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांना विपश्यना साधनेविषयी मार्गदर्शन करताना रमेश खाडे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी.