शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

‘पवारप्रेम दाखवू नका, माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 11:01 IST

नाईक-निंबाळकरांच्या भाजप प्रवेशावेळी परिचारक, शहाजीबापू, राऊत उपस्थित

ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील गेल्या दोन वर्षांपासून मोर्चेबांधणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील समविचारी आघाडीच्या नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले

सोलापूर : ‘माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही माझ्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या ठिकाणी पवारप्रेम दाखवू नका’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील समविचारी आघाडीच्या नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील गेल्या दोन वर्षांपासून मोर्चेबांधणी करीत आहेत. यासाठी त्यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील समविचारी आघाडीच्या नेत्यांना ताकद दिली. या महाआघाडीत आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, माळशिरसचे उत्तम जानकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर आदींचा यामध्ये समावेश होता. 

माढ्यातून शरद पवार यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव पुढे केले. महाआघाडीतील नेत्यांचा अंदाज घेतला. तेव्हा एक-एक नेता अंग काढून घेत असल्याचे लक्षात आले. संजय शिंदे यांनी पवारांना सहकार्य करण्याचे सुतोवाच केले. ऐनवेळी पवारांनी माघार घेतली. या माघारीनंतर माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली. यादरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय शिंदे यांना भाजपाकडून लढण्यास सांगितले. पण शिंदे यांनी नकार दिला.   मग मुख्यमंत्र्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपात प्रवेश दिला. 

आमदार प्रशांत परिचारक सोमवारी महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित होते तर राजेंद्र राऊत करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना भेटण्यासाठी आवाटी येथे निघाले होते. यादरम्यान परिचारक यांना गिरीश महाजन यांनी फोन केला तर राऊत यांना चंद्रकांतदादांनी फोन करुन मुंबईला येण्यास सांगितले. राऊत यांनी मुंबईत पोहोचण्यास सात तास लागतील. तोपर्यंत मी इकडच्या बैठका उरकून घेतो, असे सांगितले. पण मुख्यमंत्र्यांनी सहकारमंत्री देशमुख यांच्यासोबत विमानाने या, असे सांगितले. पण सहकारमंत्र्यांच्या विमानात जागा नसल्याचे सांगण्यात आले. 

मुख्यमंत्र्यांनी परिचारक आणि राऊत यांच्यासाठी स्वतंत्र विमान पाठविण्याची तयारी दाखविली. पण तोपर्यंत सुभाषबापूंच्या विमानातील जागेची अडचण दूर झाल्याचा निरोप दिला. राऊत आणि परिचारक विमानाने मुंबईला पोहोचले. 

शिंदेंचा राष्ट्रवादी प्रवेश भाजपच्या जिव्हारी सोलापूर जिल्ह्यातील पारंपरिक विरोधामुळे  संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली. संजयमामांचा राष्ट्रवादीतील प्रवेश भाजपच्या जिव्हारी लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता रणजितसिंह निंंबाळकर यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. निंबाळकरांचा सोमवारी भाजपा प्रवेश झाला. या कार्यक्रमाला माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, आमदार प्रशांत परिचारक, माजी आ.शहाजीबापू पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह सातारा जिल्ह्यातील काही नेते उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSatara areaसातारा परिसरchandrakant patilचंद्रकांत पाटीलJaykumar Goreजयकुमार गोरे