शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चड्डीवाल्यांचा सपोर्ट घेऊन मुख्यमंत्री झाला होता, हे विसरु नका; पवारांना मुख्यमंत्र्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 16:51 IST

भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस कुर्डुवाडी येथील आयोजित सभेत बोलत होते.

सोलापूर : पराभव समोर दिसत असल्यामुळेच शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. शरद पवार म्हणाले होते, भाजपामध्ये गेल्यात चड्या घालून मांड्या दाखवू नका. पण, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे विसरू नका. कारण, येथे 23 तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे, असे टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. 

भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस कुर्डुवाडी येथील आयोजित सभेत बोलत होते. "माढा मतदार संघात निवडणूक लढण्यासाठी पवार साहेब आले होते. पण ते गेले मी खेळणार नाही बारावा गडी म्हणून मॅच पाहणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. ज्याला आम्ही बारावा खेळाडू म्हणूनही खेळण्यास तयार नव्हतो. त्याला मैदानात उतरवले. आता असली कोण? आणि नकली टीम कोण?  हे येत्या 23 तारखेला समजेल. नकली टीमच्या भरोशावर मॅच जिंकू शकत नाही." 

ही निवडणूक विकासाची व राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे मजबूत देश आहे, हे सांगण्याची निवडणूक आहे असे सांगत पुलवामा हल्ल्याचा पुरावा मागणाऱ्या काँग्रेस सरकारवर त्यांनी खबरी टीका केली. भारत हा पाकिस्तानशी चर्चा करणार नाही तर नादी लागणाऱ्यांना ठोकणारा देश आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

याचबरोबर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. ते म्हणाले,'राहुल गांधी यांच्या पंजोबा, आई-वडील आणि आजी यांना सत्ता दिली. मात्र गरिबी हटवू शकले नाहीत. गेल्या पन्नास वर्षात त्यांनी भ्रष्टाचाराची मालिका दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र अवघ्या पाच वर्षात सामान्यांच्या जीवनात परिवर्तन करीत पारदर्शी प्रामाणिक शासन दिले व जगासमोर भारताला मजबूत देश बनवला.' 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSolapurसोलापूरBJPभाजपाsolapur-pcसोलापूर