गाफील राहू नका, मुकाबला करा :प्रणिती

By Admin | Updated: September 23, 2014 14:21 IST2014-09-23T14:21:45+5:302014-09-23T14:21:45+5:30

शिंदे कुटुंबीयांची नाळ सोलापूरशी जोडली असून, येत्या विधानसभा निवडणुकीत गाफील राहू नका, शत्रूचा मुकाबला करा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

Do not be confused, compete with: Praniti | गाफील राहू नका, मुकाबला करा :प्रणिती

गाफील राहू नका, मुकाबला करा :प्रणिती

सोलापूर : लोकसभेच्या निवडणुकीत जातीवादी शक्तीच्या लाटेमुळे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला आणि आपण सोलापूरकर फसलो. शिंदे कुटुंबीयांची नाळ सोलापूरशी जोडली असून, येत्या विधानसभा निवडणुकीत गाफील राहू नका, शत्रूचा मुकाबला करा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. 

प्रभाग क्र.२९ मध्ये टकारी समाज कार्यालय येथे शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या 'जनसंपर्क अभियान'प्रसंगी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, महापौर प्रा. सुशीला आबुटे, विमल मरगू, माणिकसिंग मैनावाले, सुमन जाधव, अरूण नंदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, पावती फाडणार्‍या लोकांपासून सावध राहा. मी आपली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. यावेळी सिद्राम अट्टेलूर, अँड. राजू जाधव, आशा म्हेत्रे, मनीष गडदे, केशव इंगळे, रमेश जाधव, परशुराम सतारवाले, गैबू जाधव, राजू कलकेरी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Do not be confused, compete with: Praniti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.