सोलापूर : मागील अनेक वर्षांपासून हुतात्मा एक्सप्रेसला डबा वाढवण्याची मागणी होत होती. या मागणीला यश आले असून शुक्रवारपासून हुतात्मा एक्सप्रेसला एक कोच वाढवण्यात आला आहे. यामुळे या कोचमधून आणखी ऐंशी प्रवाशांना झोपून प्रवास करता येणार आहे.
यापूर्वी या गाडीला १६ डबे होते. या गाडीला शुक्रवारपासून १७ डबे करण्यात आले आहेत. म्हणजेच एक कोच वाढवण्यात आला आहे.यामुळे सोलापूरच्या प्रवाशांना एकप्रकारे दिलासा मिळणार आहे. यात एकूण द्वितीय श्रेणी चेअर कारचे १३, एसी चेअर कारचा एक, द्वितीय श्रेणी एसएलआर एक आणि पॉवर कार एक असे एकूण १७ डबे असणार आहेत. हा डबा कायमस्वरूपी असणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.