शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

‘नमामि चंद्रभागा’चे कामाची आठ भागात विभागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 11:59 IST

विभागीय आयुक्तांची माहिती : तत्काळ उपाययोजनांसाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदत

ठळक मुद्दे‘आषाढी वारी-२०१८’ हा अ‍ॅप तयार करण्यात आलानिधी परत जाण्याच्या प्रकरणी अहवाल मागविलासोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज चांगले

सोलापूर : राज्य शासनाने हाती घेतलेल्या नमामि चंद्रभागा अभियानाच्या कामाचे स्वरूप ठरवून आठ भागात विभागणी के ली आहे. तसेच तत्काळ उपाययोजनांच्या पूर्ततेसाठी यंत्रणेला ३१ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषद आणि महसूल विभागाच्या नियमित आढाव्यासाठी डॉ. म्हैसेकर येथे आले होते. अधिकाºयांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नमामि चंद्रभागा अभियानासंदर्भात ते म्हणाले, या मोहिमेचे स्वरूप व्यापक आहे. भीमाशंकर ते चंद्रभागा असा हा अभियानाचा प्रवास असून २०२२ पर्यंत कालबद्ध कार्यक्रम सरकारने आखला आहे.

त्या दृष्टीने कामाचे नियोजन सुरू आहे. नदीचा आराखडा तयार करून कामाचे नियोजन आखले जात आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांशी संबंधित हे अभियान असून पाच नगरपालिका आणि दोन महानगरपालिकांमधील घनकचरा नियोजनाचे कामही या अंतर्गत आखण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महानगरपालिकांना त्यासंदर्भात निर्देशही देण्यात आले आहेत. विविध प्रकल्प आणि नदीकाठावरील साखर कारखान्यांकडून नदीमध्ये सोडल्या जाणाºया सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पंढरपूर ते उजनी, उजनी ते पुणे आणि पुणे ते भीमाशंकर अशा तीन टप्प्यात चंद्रभागा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी काम केले जाणार आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेतील अखर्चित निधी परत जाण्याच्या प्रकरणी अहवाल मागविला असून त्रुटी आढळलेल्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. संबंधितांना ३१ जुलैपर्यंत कालावधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज चांगले चालले असून राज्य स्तरावर नोंद घेण्यासारखे काम येथे झाले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एका उत्तरादरम्यान व्यक्त केली.

आषाढी वारी २०१८ अ‍ॅपच्वारकºयांच्या सुविधेसाठी यंदा प्रथमच ‘आषाढी वारी-२०१८’ हा अ‍ॅप तयार करण्यात आला आहे. यात वारीला येणाºया मुख्य पालख्यांचे मार्ग, वेळापत्रक, वैद्यकीय सुविधा, महत्त्वाचे क्रमांक या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. प्ले स्टोअरवरून वारकरी हा अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये नि:शुल्क डाऊनलोड करू शकतात. यापूर्वी पुणे जिल्ह्यापुरता हा अ‍ॅप मर्यादित होता. त्याला व्यापक करून पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील वारीसंदर्भातील माहितीचा समावेश यात करण्यात आला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPuneपुणे